काँग्रेसचा हात आणि 'थप्पड'! विनेश फोगाट कडाडली; विरोधकांना दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 18:41 IST2024-09-25T18:40:20+5:302024-09-25T18:41:20+5:30

विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे.

 Haryana Assembly Election 2024 Congress candidate Vinesh Phogat has warned the opposition | काँग्रेसचा हात आणि 'थप्पड'! विनेश फोगाट कडाडली; विरोधकांना दिला गंभीर इशारा

काँग्रेसचा हात आणि 'थप्पड'! विनेश फोगाट कडाडली; विरोधकांना दिला गंभीर इशारा

Haryana Assembly Election 2024 : भारताची माजी स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे. काँग्रेसच्या तिकीटावर ती जुलाना या मतदारसंघातून नशीब आजमावत आहे. विनेशने विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने जुलानाची जागा चर्चेत आहे. भाजप आणि आम आदमी पक्षाने देखील इथे तगडा उमेदवार दिला आहे. विनेश प्रचारात व्यग्र आहे. प्रचारादरम्यान विनेशने एक मोठा दावा करताना खेळाडूंसाठी खेळाडूच पॉलिसी तयार करतील असे तिने सांगितले होते. आता विनेशने विरोधकांना फटकारताना आणि त्यांना इशारा देताना एक मोठे विधान केले.

काँग्रेसच्या पंजाचे निशाण कानाखाली मारण्याचे काम करेल. हे हाताचे निशाण आहे, हा हात थप्पड मारण्याचे काम करेल. याशिवाय थप्पडचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचेल, असेही विनेश फोगाटने सांगितले. अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विनेशने राजकारणात येण्यामागील कारण सांगितले होते. राजकारणात येणे माझ्यासाठी मजबुरी बनले होते. पर्याय म्हणून मी राजकारणात प्रवेश केला नाही. आम्ही रस्त्यावर लढलो, पण आम्हाला काय मिळाले? आम्हाला शिवीगाळ आणि अपमानांशिवाय काहीच मिळाले नाही. मी ऑलिम्पिकला गेले, चांगली खेळले, पण मला न्याय मिळाला का? आम्हाला कधीच न्याय मिळाला नाही. राजकारणात प्रवेश करणे ही एक गरज होती.

आम आदमी पार्टीने विनेश फोगाटच्या विरोधात WWE महिला रेसलर कविता दलाल यांना उमेदवारी दिली आहे. कविता दलाल यांनी काही दिवसांपूर्वी 'आप'मध्ये प्रवेश केला होता. जींद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कविता या उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बिजवाडा गावच्या सूनबाई आहेत. त्या WWE मधील भारतातील पहिल्या महिला रेसलर आहेत. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पासून विनेश फोगाट प्रसिद्धीच्या झोतात आहे. अंतिम फेरी खेळता न आल्याने विनेश ऑलिम्पिक पदकाला मुकली. मग मायदेशात परतताच तिने काँग्रेसचा हात धरला. 

Web Title:  Haryana Assembly Election 2024 Congress candidate Vinesh Phogat has warned the opposition