शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चॅम्पियन्स ट्रॉफीचे भवितव्य धोक्यात

By admin | Updated: June 24, 2016 01:13 IST

जगाच्या क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धेत गणना होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे भवितव्य धोक्यात असून, २0२१ मध्ये या स्पर्धेला पूर्णविराम देण्याविषयी विचारविमर्श सुरू आहे.

नवी दिल्ली : जगाच्या क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धेत गणना होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे भवितव्य धोक्यात असून, २0२१ मध्ये या स्पर्धेला पूर्णविराम देण्याविषयी विचारविमर्श सुरू आहे.पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी ही अखेरची स्पर्धा असू शकते आणि त्या जागेवर एक नवीन एकदिवसीय लीग सुरू होण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २0१३ नंतर संपवण्याची योजना सुरू होती; परंतु ही स्पर्धा आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरल्याने तो निर्णय मागे घेण्यात आला होता.आतापर्यंतच्या ७ सत्रांनंतरदेखील चॅम्पियन्स ट्रॉफी विशेष काही करण्यात अपयशी ठरली आहे आणि आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करीत असतानाचे चित्र आहे. याशिवाय अन्य एक प्रमुख कारण म्हणजे दोन वर्षांच्या अंतराने टष्ट्वेंटी-२0 वर्ल्डकपचे आयोजन होते. त्याचा परिणामही चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाहावयास मिळतो. चॅम्पियन्स ट्रॉफीपासून होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई टष्ट्वेंटी-२0 वर्ल्डकप यशस्वीपणे भरून काढते. पुढील वर्षी १ ते १८ जूनदरम्यान होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण १५ सामने खेळवले जाणार आहेत. २0२१ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा निरस होण्याच्या स्थितीत भारताला २0२२ आणि २0२४ च्या टष्ट्वेंटी-२0 वर्ल्डकप स्पर्धा आयोजित करण्याचा हक्क मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटविषयी होणाऱ्या आयसीसीच्या समीक्षेत वैश्विक स्पर्धेबरोबरच कसोटी आणि वनडे क्रिकेटची संख्या कमी करण्याचादेखील प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. त्यात खेळाडूंना द्विपक्षीय सीरिज, देशांतर्गत लीगसाठी जास्त वेळ उपलब्ध होऊ शकेल. चॅम्पियन्स ट्रॉफी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटविषयी आयसीसीच्या विद्यमान समीक्षेची शिकार बनू शकते. त्या स्थानी २0१९ मध्ये वनडे लीग आयोजित करण्याची योजना आहे. त्यात १३ देशांचा समावेश केला जाऊ शकतो. तथापि, वर्ल्डकपबरोबरच ५0 षटकांच्या आणखी एका स्पर्धेमुळे वेळापत्रक आणखी व्यस्त होईल आणि चाहते गोंधळात पडतील.