Five players, including hockey captain Manpreet, corona positive | हॉकी कर्णधार मनप्रीतसह पाच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

हॉकी कर्णधार मनप्रीतसह पाच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग याच्यासह ५ खेळाडू बेंगळुरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) केंद्रात कोरोना पॉझिटिव्ह आढळले. मनप्रीतशिवाय बचाव फळीतील सुरेंद्र कुमार, जसकरणसिंग , ड्रॅगफ्लिकर वरुण कुमार व गोलरक्षक कृष्णा पाठक यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. हे खेळाडू एक महिन्याच्या ब्रेकनंतर घरून येथे दाखल झाले होते.

‘येथे आल्यानंतर कोरोना चाचणी अनिवार्य होती. सध्या साइ परिसरात क्वारंटाईन असून सुविधा उत्तम आहेत. लवकरच बरा होईन,’ असा विश्वास मनप्रीतने व्यक्त केला. आधी चारही खेळाडूंची रॅपिड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मनप्रीत आणि सुरेंद्र यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागताच त्यांना तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या दहा खेळाडूंची गुरुवारी आरटी पीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यातून हे चार जण बाधित आढळले आहेत. 
 

Web Title: Five players, including hockey captain Manpreet, corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.