शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मयूरेशच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST

मुंबई - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आकस्मिक निधन झालेला महाराष्ट्राचा नेटबॉलपटू मयूरेश पवार याच्या कटुंबीयांची शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सातार्‍यात भेट घेऊन मयूरेशच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.खटाव तालुक्यातील मायणी येथील त्याच्या घरी जाऊन तावडे यांनी त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाराष्ट्र राज्य क्रीडा विकास निधीतून ५ ...


मुंबई - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आकस्मिक निधन झालेला महाराष्ट्राचा नेटबॉलपटू मयूरेश पवार याच्या कटुंबीयांची शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सातार्‍यात भेट घेऊन मयूरेशच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
खटाव तालुक्यातील मायणी येथील त्याच्या घरी जाऊन तावडे यांनी त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाराष्ट्र राज्य क्रीडा विकास निधीतून ५ लाख रुपयांची मदत त्यांनी घोषित केली व नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी मयूरेश पवारच्या नावाने सातारा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार सुरू करण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले. तसेच, मयूरेशचा लहान भाऊ आकाश याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल, असेही त्यांनी जाहीर केले.
मयूरेशसमवेत स्पर्धेसाठी गेलेला नेटबॉल खेळाडू व त्याचा मित्र गणेश चौधरी मयूरेशच्या मृत्यूने बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे रुग्णालयात दाखल झाला आहे. तावडे यांनी त्याचीही भेट घेऊन त्याच्या कुटुंबाची विचारपूस केली. गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञाकडून त्याचे काऊन्सेलिंग करण्यात येईल. गरज भासल्यास मुंबई अथवा पुणे येथे विशेष वैद्यकीय उपचारासाठी त्याला हलवण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)