शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पदक पटकावण्यासाठी विदेशात प्रशिक्षण आवश्यक : साक्षी मलिक

By admin | Updated: October 31, 2016 19:08 IST

आॅलिम्पिकमध्ये अधिक पदके पटकावण्यासाठी सुरुवातीपासून तयारी करायला हवी आणि खेळाडूंना विदेशात प्रशिक्षण द्यायला हवे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 31 - आॅलिम्पिकमध्ये अधिक पदके पटकावण्यासाठी सुरुवातीपासून तयारी करायला हवी आणि खेळाडूंना विदेशात प्रशिक्षण द्यायला हवे, असे मत रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेली महिला मल्ल साक्षी मलिकनेव्यक्त केले. साक्षी म्हणाली,‘पीडब्ल्यूएल प्रारंभ होण्यापूर्वी प्रत्येक संघासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन होणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेषत: भारतीय खेळाडूंना आॅलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंकडून शिकण्याची संधी मिळेल. या शिबिराच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंना आपल्या उणिवा दूर करता येतील.’ शिबिर केवळ औपचारिकता पूर्ण करणारे असू नयेत, यावरही साक्षीने विशेष भर दिला.साक्षीने राष्ट्रीय संघातील खेळाडूंना विदेशात खेळण्याचा अनुभव मिळावा, यावर अधिक भर दिला. साक्षी म्हणाली,‘पुढील आॅलिम्पिकची तयारी आतापासून सुरू व्हायला हवी. मल्लांसाठी डॉक्टरांपासून फिजिओपर्यंतच्या सर्व सुविधा मिळायला हव्यात.’ भारतातील महिला कुस्तीच्या स्थितीबाबत साक्षी समाधानी नाही. भारतात हजारो मल्ल सराव करतात पण, पदक केवळ एक मिळाले, असेही सांगताना साक्षी म्हणाली,‘कुस्ती या खेळात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हायला हवे.’ स्वागत समारंभामुळे माझ्या तयारीवर प्रभाव पडला असला तरी पीडब्ल्यूएलमध्ये तयारीसह उतरणार असल्याचे साक्षीने स्पष्ट केले. आगामी आशियाई व विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे सांगताना साक्षीने आॅलिम्पिकमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. विवाहनंतरही मल्लांच्या कुटुंबाची सदस्य होणार असल्याचा अभिमान वाटतअसल्याचे साक्षीने सांगितले. साक्षीचे पती सत्यव्रत कादियान राष्ट्रीय चॅम्पियन असून ९७ किलो वजनगटात आंतरराष्ट्रीय मल्ल आहेत.