शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Asian Games 2018 : आशियाई स्पर्धा उद्घाटनाची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 4:14 AM

शनिवारी रात्री १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

- अभिजीत देशमुख(थेट जकार्ता येथून)जकार्ता : शनिवारी रात्री १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडणार असून याकडे आशिया खंडातील ४५ देशांसह संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.जकार्ताच्या प्रतिष्ठित गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर रंगणाऱ्या या भव्य सोहळ्याद्वारे यजमान इंडोनेशिया संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेईल.या सोहळ्यासाठी १२० मीटर लांबी, ३० मीटर रूंदी आणि २६ मीटर उंचीचा मंच एका भव्य पर्वताच्या प्रतिकृतीत उभारण्यात आला आहे. सुप्रसिद्ध इंडोनेशियन नृत्यदिगदर्शक डेन्नी मलिक व एको सुप्रियांटो यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ४ हजार नर्तक येथे आपली कला सादर करतील. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध इंडोनेशियन संगीतकार एडी एमस रोनाल्ड स्टीव्हन हे आपल्या शंभरपेक्षाही जास्त वाद्यवृंदच्या तालावर उत्साही आणि रोमांचक सादरीकरण करतील. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला पॉप गायक आंगुंग च्या प्रदर्शनाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. यावेळी स्पर्धेत सहभागी ४५ देशांच्या संघाची परेड सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. यावेळी भालाफेकपटू नीरज चोप्रा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. विशेष म्हणजे तीन अब्ज टेलिव्हिजन व इंटरनेट प्रेक्षकांवर ठसा उमटवण्याची इंडोनेशियाला या स्पर्धेद्वारे संधी लाभली आहे. हा दिमाखदार सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता सुरु होईल.भारताचे लक्ष सर्वोत्तम खेळावरजकार्ता : राष्ट्रकुल स्पर्धेतील चांगल्या कामगिरीनंतर भारतीय संघाचे लक्ष्य आता आशियाई स्पर्धेत चांगला खेळ करण्याकडे आहे. येथे पोहचण्यात संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतरही सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याबाबत संघात उत्साह आहे.आशियाई स्पर्धेची तयारी संघासाठी तणावपूर्ण राहिली. त्यात निवडीबाबत तक्रारी आणि न्यायालयीन कारवाई सोबतच नेहमीप्रमाणे पथकाच्या ८०४ सदस्यसंख्येबाबतही वाद निर्माण झाला. तसेच, पथकासोबत असलेल्या अधिकाºयांच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले.मात्र भारतीय खेळाडू आता फक्त आपल्या खेळावरच लक्ष देत आहेत. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकांच्या बाबतीत दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन केले. मात्र जास्तीत जास्त खेळाडू आणि प्रशिक्षकांनी मान्य केले की, आशियाई स्पर्धेत चीन, जापान, कोरिया या सारख्या देशांच्या उपस्थितीने आव्हान आणखी कडवे होेते. मात्र त्यामुळे उत्साह कमी झालेला नाही.भारताने २०१४ आशियाडमध्ये पदकांच्या संख्येच्याबाबतीत आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली होती. भारताने त्यात ११ सुवर्ण पदकांसह ५७ पदक मिळवले होते. संभाव्य पदकविजेत्यांमध्ये नेमबाजीत मनु भाकर, कुस्तीत सुशील कुमार, भालाफेकीत नीरज चोप्रा आघाडीवर आहेत. या पथकात हिमा दास हिचा समावेश आहे. २० वर्षांखालील विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण विजेती धावपटू असलेल्या हिमाकडून भारताला विशेष आशा आहे.बॅडमिंटन, कुस्ती, हॉकी संघावर नजर...भारताच्या ट्रॅक व फिल्डच्या खेळाडूंनी आशिया स्पर्धेच्या इतिहासात शानदार खेळ केला आहे. त्यात ७४ सुवर्णपदके मिळवली आहेत. बॅडमिंटन कोर्टवर सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधू यांचे कडवे आव्हान आहे. के. श्रीकांत आणि एच.एस. प्रणय यांच्यामुळे भारताला आणखी पदके मिळण्याची शक्यता आहे. कुस्तीत बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकासह २०२० आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याकरता खेळेल. त्याचवेळी महिला संघ गत स्पर्धेतील कांस्यपदकाचा रंग बदलण्यास उत्सुक आहे.

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८IndonesiaइंडोनेशियाIndiaभारत