धोनीच्या कामगिरीवर राहणार सर्वांचे लक्ष

By Admin | Updated: January 17, 2015 02:59 IST2015-01-17T02:59:24+5:302015-01-17T02:59:24+5:30

कसोटी मालिकेत पराभव स्वीकारणारा भारतीय संघ आता वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेसाठी सज्ज होत आहे. शुक्रवारी सकाळ

Everyone's attention will be on Dhoni's performance | धोनीच्या कामगिरीवर राहणार सर्वांचे लक्ष

धोनीच्या कामगिरीवर राहणार सर्वांचे लक्ष

मेलबोर्न : कसोटी मालिकेत पराभव स्वीकारणारा भारतीय संघ आता वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेसाठी सज्ज होत आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात सुरुवातीला क्षेत्ररक्षणाचा सराव करणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यानंतर नेटमध्ये कसून सराव करीत वन-डे सामन्यांची तयारी केली.
भारतीय संघाला तिरंगी मालिकेत १८ जानेवारी रोजी यजमान आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीवर नजर राहील. धोनीने या मैदानावर गेल्या महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. निवृत्तीच्या निर्णयानंतरही धोनीने संघासोबत प्रवास केला. त्याने सिडनीमध्ये नेटमध्ये सरावही केला. त्याने निवृत्तीच्या निर्णयाबाबत अद्याप जाहीर वक्तव्य केलेले नाही. यष्टिरक्षण व क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत संघाचे नेतृत्व करण्याचा धोनीच्या शरीरावर विपरीत परिणाम जाणवत होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Everyone's attention will be on Dhoni's performance