शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक राज्याने एका खेळाचा विकास करावा-क्रीडामंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 02:38 IST

म्ही प्रत्येक राज्याला एक खेळ निवडण्यास सांगितले आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर मणिपूरने बॉक्सिंग, सेपक टॅकरॉ, फुटबॉल किंवा तिरंदाजीची निवड केल्यास त्या खेळावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल.

नवी दिल्ली: आॅलिम्पिकमध्ये अधिक पदके जिंकण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत प्रत्येक राज्याने कुठल्याही एका खेळाची निवड करून त्या खेळाच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी केली.अ‍ॅसोचेमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या फिट इंडिया के लिए कॉर्पोरेट भारत की भूमिका’ या विषयावरील वेबिनारमध्ये बोलताना क्रीडामंत्र्यांनी कार्पोरेट क्षेत्राला देखील अशीच भूमिका वठविण्याचे आवाहन केले. ते म्हणाले,‘आम्ही प्रत्येक राज्याला एक खेळ निवडण्यास सांगितले आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर मणिपूरने बॉक्सिंग, सेपक टॅकरॉ, फुटबॉल किंवा तिरंदाजीची निवड केल्यास त्या खेळावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल.याशिवाय काही धोरणात्मक बदल केले असून याअंतर्गत प्रत्येक कॉर्पोरेटने एखादी स्पर्धा दत्तक घेत त्यावर पूर्ण लक्ष देण्याची योजना आहे. तथापि यामुळे अन्य खेळांना मदत पुरविण्यापासून तुम्हाला रोखण्यात येणार नाही. भारतासारख्या मोठ्या देशात अनेक स्पर्धांवर लक्ष देण्याची गरज आहे. सर्व राज्यांनी एकेक खेळाचा अंगिकार केल्यास क्रीडा क्षेत्राला मोठी उभारी मिळू शकेल.‘आमच्याकडे ३६ राज्ये आहेत. सर्व राज्यांनी ३६ खेळांवर लक्ष केद्रित केल्यास अपेक्षित निकाल मिळू शकतील,’ अशी अपेक्षा करीत भारत २०२८ च्या लॉस एंजिलिस आॅलिम्पिकमध्ये पदक तालिकेत पहिल्या दहा देशात राहील,या अपेक्षेचा रिजिजू यांनी पुनरुच्चार केला.(वृत्तसंस्था)

टॅग्स :Indiaभारत