शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

युरो कप : इंग्लंडचा वेल्सला दणका

By admin | Updated: June 16, 2016 21:38 IST

पहिल्याच मिनिटामध्ये डॅनियल स्टरीज याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर इंग्लंडने युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या ‘बॅटल आॅफ ब्रिटन क्लॅश’ सामन्यात वेल्स संघाला २-१ असे पराभूत केले

ऑनलाइन लोकमतलेन्स, दि. 16 - अतिरिक्त वेळेच्या पहिल्याच मिनिटामध्ये डॅनियल स्टरीज याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर इंग्लंडने युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या ‘बॅटल आॅफ ब्रिटन क्लॅश’ सामन्यात वेल्स संघाला २-१ असे पराभूत केले. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मध्यंतराच्या काही मिनिटांअगोदर मिळालेली फ्री किक सत्कारणी लावताना गॅरेथ बेल याने ४२व्या मिनिटाला वेल्सला आश्चर्यकारकरीत्या १-० असे आघाडीवर नेले. यानंतर वेल्सने भक्कम बचाव करताना मध्यंतराला १-० असे वर्चस्व राखले.मध्यंतरानंतर मात्र इंग्लंडने अपेक्षेनुसार आक्रमक खेळ करताना वेल्सला गाठण्याच्या प्रयत्न केला. सुरुवातीला स्टार वेन रुनी गोल करण्यात सातत्याने अपयशी ठरल्यानंतर त्याने बचावात्मक भूमिका घेत संघाचा बचाव भक्कम करण्यावर अधिक भर दिला. यावेळी इंग्लंडने बदली खेळाडू म्हणून जेमी वर्डी आणि स्टरीज यांना मैदानात उतरवले. या दोघांनी निर्णायक आक्रमक खेळ करताना आपल्या प्रशिक्षकांचा निर्णय सार्थ ठरवला. मध्यंतरानंतर लगेच या दोघांनीही वेल्सच्या गोलजाळ्यावर हल्ला करताना आपला इरादा स्पष्ट केला. ५६व्या मिनिटाला इंग्लंडने वेल्सच्या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली आणि यावेळी वर्डीने मिळालेल्या संधीचा फायदा उचलताना महत्त्वपूर्ण गोल करुन संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. या गोलमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या इंग्लंडने अधिक आक्रमक खेळ करताना वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेल्सच्या भक्कम बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. निर्धारीत वेळेतही बरोबरी कायम राहिल्यानंतर ३ मिनिटांचा अतिरीक्त वेळ देण्यात आला. यावेळी पहिल्याच मिनिटामध्ये स्टरीजने डेले अलीच्या पासवर निर्णायक गोल करताना इंग्लंडला २-१ असे आघाडीवर नेत वेल्सच्या आव्हानातली हवा काढली. यानंतर हीच आघाडी कायम राखून इंग्लंडने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.