शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या दिवसाखेरीस इंग्लंड ५ बाद १०३

By admin | Updated: November 18, 2016 16:57 IST

भारताविरुद्धच्या दुस-या कसोटीच्या दुस-या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडने ५ गडी गमावत १०३ धावा केल्या आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

विशाखापट्टणम, दि. १८ -  भारताविरुद्धच्या दुस-या कसोटीच्या दुस-या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडने ५ गडी गमावत १०३ धावा केल्या आहेत. भारताचा पहिला डाव ४५५ धावांवर संपुष्टात आल्यानंतर फलंदाजी करायला उतरलेल्या इंग्लंडचा निम्मा संघ अवघ्या ८० धावांत तंबूत परतला. दिवसाचा खेळ संपताना स्टोक्स (१२) आणि बेअरस्टो (१२) खेळत आहेत. 
 आहे. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांस जेरीला आणले. भारतातर्फे अश्विनने २ तर शामी आणि यादवने प्रत्येकी १ बळी टिपला.
कर्णधार अॅलिस्टर कुक अवघ्या (२) धावांवर शामीच्या एक अप्रतिम चेंडूवर क्लीनबोल्ड झाला. त्यानंतर इंग्लंडचे अर्धशतक पूर्ण होताच हमीद (१३) धावबाद झाला.  तर त्याच्यापाठोपाठ डकेट ५ धावांवर बाद झाल्याने इंग्लंडची अवस्था ३ बाद ७३ अशी झाली आहे. त्यानंतर जो रूटने अर्धशतक झळकावले खरे पण तो ५८ धावांवर खेळत असताना अश्विनच्या गोलंदाजीवर तो बाद झाल्याने इंग्लंडला चौथा धक्का बसला. तर यादवच्या गोलंदाजीवर अली (१) पायचीत झाल्याने इंग्लंडला पाचवा धक्का बसला. 
 
इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत भारताचा पहिला डाव ४५५ धावांत संपुष्टात आला. कर्णधार कोहली (१६७) बाद झाल्यानंतर भारताचा गडगडलेला डाव अश्विनने (५८) सावरण्याचा  प्रयत्न केला, मात्र अखेर भारताचे सर्व गडी ४५५ धावांमध्ये  बाद झाले. मोहम्मद शामी ६ धावांवर नाबाद राहिला.
 
४ बाद ३१७ वरुन भारताने दुस-या दिवसाचा खेळ सुरू केला. मात्र थोड्याच वेळात कर्णधार कोहली १६७ धावांवर बाद झाला व त्यानंतर संघाचा डाव छेपाळला. कोहलीपाठोपाठ वृद्धीमान सहा ३ तर जडेजा भोपळाही न फोडता (०) बाद झाल्याने भारताला लागोपाठ दोन धक्के बसले. १०७ षटकांत ७ गडी गमावत भारताने ३६६ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर आर. अश्विनने यादवच्या सहाय्याने भारताचा ढेपाळलेला डाव सावरत ४००चा टप्पा पार करून दिला. उपहारापर्यंत भारताने ११९ षटकांत एकूण ४१५ धावा केल्या आहेत. अर्धशतक करून (५८) अश्विनही तंबूत परतला व त्यानंतर एकूण ४५५ धावांत भारताचे सर्व गडी बाद झाले. 
इंग्लंडतर्फे अँडरसन आणि अलीने प्रत्येकी ३ तर ब्रॉड, स्टोक्स आणि रशीदने १-१ बळी टिपला.