शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

सायनाचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: August 14, 2016 21:23 IST

रिओ - ऑलिंपिकमध्ये भारताच्या सायना नेहवालचे आव्हान दुसर्‍या फेरीत संपुष्टात आले.

ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. 14 - ऑलिंपिकमध्ये भारताच्या सायना नेहवालचे आव्हान दुसरी फेरी सुरू असताना संपुष्टात आले. रविवारी ‘जी’ गटात सायनाला युक्रेनच्या मारिजा युलिटीना हिने २१-१८, २१-१९ असे पराभूत केले. सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये सामना बरोबरीत झाला. सायनाने पहिल्या सेटमध्ये चांगली सुरुवात करून ५-१ अशी आघाडी घेतली होती. परंतु मारियाने सामन्यात पुनरागमन करत ८-८ अशी बरोबरी साधली. 

सायनाने काही चांगले शॉट खेळून पुन्हा एकदा ११-९ अशी आघाडी घेतली. मात्र मारियाने जोरदार लढत देऊन १३-१३ अशी बरोबरी साधली. यूक्रेनच्या खेळाडूने १९-१७ अशी आघाडी घेतली आणि ही आघाडी कायम राखत पहिला सेट २१-१८ असा जिंकला. मारियाने दुसऱ्या सेटची सुरुवात जोरदार करत पहिला अंक मिळवला. परंतु सायनाने जोरदार प्रत्युत्तर देत सलग चार अंक मिळवले आणि सेटमध्ये ४-१ अशी आघाडी घेतली. मारियाने पुन्हा एकदा सामन्यात परतत ४-४ अशी बरोबरी केली. सायनाने पुन्हा ७-६ अशी आघाडी घेतली. परंतु नेटवर शॉट मारून सायनाने अंक गमावला आणि मारियाला आघाडी घेण्याची संधी दिली. २ अंकांनी यूक्रेनची खेळाडू पुढे असताना सायनाने पुन्हा ९-९ अशी बरोबरी केली. सायनाने पुन्हा आघाडी घेत स्कोर १२-१० असा बरोबरीत आणला. सामन्याच्या शेवटच्या क्षणी दोन्ही खेळाडूंनी आक्रमक शॉट खेळले. परंतु शेवटी मारियाने हा सेटही १९ विरुद्ध २१ अंकांनी जिंकला.