एकनाथ क्लब ‘अ’ संघाचे विजेतेपद

By Admin | Updated: May 12, 2015 00:24 IST2015-05-12T00:24:04+5:302015-05-12T00:24:04+5:30

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ‘अ’ संघाने आपल्याच ‘ब’ संघाला ३ विकेट्सनी नमवून महाराष्ट्र माझा सेवा संस्थाच्या वतीने पार पडलेल्या ठाणे प्रिमियर

Eknath Club 'A' championship | एकनाथ क्लब ‘अ’ संघाचे विजेतेपद

एकनाथ क्लब ‘अ’ संघाचे विजेतेपद

मुंबई : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ‘अ’ संघाने आपल्याच ‘ब’ संघाला ३ विकेट्सनी नमवून महाराष्ट्र माझा सेवा संस्थाच्या वतीने पार पडलेल्या ठाणे प्रिमियर लीग टी-२० क्रिकेट स्पधेचे विजेतेपद उंचावले.
प्रथम फलंदाजी करताना ‘ब’ संघाने निर्धारीत २० षटकांत ५ बाद १३१ अशी समाधानकार मजल मारली होती. या आव्हानाचा ‘अ’ संघाने यशस्वी पाठलाग केला खरा, मात्र हे सोपे वाटणारे आव्हान गाठताना ‘अ’ संघाची चांगलीच दमछाक झाली. विजय मिळवताना ‘अ’ संघाने आक्रमक फलंदाजी करताना १८.३ षटकांत १३२ धावा फटकावल्या, परंतु यासाठी त्यांचे ७ फलंदाज बाद झाले. शशांक सिंगने मोक्याच्यावेळी निर्णायक ६५ धावांची फटकेबाजी करुन संघाला विजेतेपद मिळवून दिले. रोहन राजे (२०) याने देखील चांगली फलंदाजी केली. हेमंत बुचडे (३/२३) आणि अक्षय पालकर (३/२३) यांनी नियंत्रित मारा करताना ‘अ’ संघाला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कौस्तुभ पवार (५४) आणि अक्षय पालकर (४५) यांच्या जोरावर ‘ब’ संघाने समाधानकारक मजल मारली होती. मनिष राव (२/२३) आणि रोहन राजे (२८/२) यांनी अचूक मारा करताना ‘ब’ संघाला रोखण्याची कामगिरी केली होती. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Eknath Club 'A' championship