शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ईडीची बीसीसीआय, आयपीएलला नोटीस

By admin | Updated: February 17, 2015 00:35 IST

अफरातफरीत फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) बीसीसीआय, आयपीएलचे अधिकारी आणि खासगी मल्टिमीडिया फर्मला नोटीस बजावली आहे.

मुंबई : २००९ मध्ये आयपीएल मीडिया अधिकार अफरातफरीत फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) बीसीसीआय, आयपीएलचे अधिकारी आणि खासगी मल्टिमीडिया फर्मला नोटीस बजावली आहे. या सर्वांवर ४२५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. या प्रकरणी ज्यांना नोटीस बजावण्यात आली, त्यात बीसीसीआयचे निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन, तत्कालीन आयपीएल आयुक्त ललित मोदी, सीओओ सुंदर रमण यांच्यासह वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप (डब्ल्यूएसजी)आणि मल्टी स्क्रीन मीडिया (एमएसएम) यांचा समावेश आहे. या सर्वांवर मीडिया अधिकार देताना अफरातफर केल्याचा आणि अवैध व्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोमवारी आयपीलएच्या आठव्या पर्वाचा लिलाव सुरू असताना ईडीने ही कारवाई केली, हे विशेष. बीसीसीआयने २००८ साली डब्ल्यूएसजी या कंपनीला ९१८ मिलियन अमेरिकन डॉलर रकमेच्या मोबदल्यात दहा वर्षांचे मीडिया अधिकार बहाल केले होते. त्याच वर्षी डब्ल्यूएसजीने एमएसएमशी करार करीत सोनीला अधिकृत ब्रॉडकास्टर बनविले. वर्षभरानंतर हा करार बदलण्यात येऊन नऊ वर्षांचा करण्यात आला. त्यापोटी मल्टी स्क्रीनने १.६३ बिलियन अमेरिकन डॉलर मोजले होते. एमएसएम ही सिंगापूरची तसेच डब्ल्यूएसजी ही मॉरिशस येथील कंपनी आहे. ईडीने २००९ साली या व्यवहाराची फेमा (परकीय चलन विनिमय) कायद्यांतर्गत चौकशी सुरू केली. एमएसएमने डब्ल्यूएसजीला ४२५ कोटी रुपये सुविधा शुल्कापोटी अवैधरीत्या दिल्याचा आरोप आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम करारातील अटीनुसार बीसीसीआयला मिळाली नसून अवैध लाभार्र्थ्यांना पोहोचली. प्रसारण कराराशी संलग्न असलेल्या सर्वच अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविल्यानंतर ईडीने नोटीस बजावली आहे. ४५ दिवसांच्या आत सर्वांनी अपील करावे, असे ईडीच्या नोटिशीत म्हटले आहे. (वृत्तसंस्था)