डॅरेल डफी मोहन बगानकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 20:34 IST2016-06-27T20:34:24+5:302016-06-27T20:34:24+5:30

स्कॉटलँडचा आघाडीपटू डॅरेल डफी आता कोलकात्याच्या मोहन बगान संघाकडून खेळणार आहे. आय-लीग स्पर्धेतून गोव्याचे साळगावकर आणि स्पोर्टिंग संघ बाहेर पडले आहेत.

Durban Duffy Mohan | डॅरेल डफी मोहन बगानकडे

डॅरेल डफी मोहन बगानकडे

ऑनलाइन लोकमत
मडगाव, दि. २७ -  स्कॉटलँडचा आघाडीपटू डॅरेल डफी आता कोलकात्याच्या मोहन बगान संघाकडून खेळणार आहे. आय-लीग स्पर्धेतून गोव्याचे साळगावकर आणि स्पोर्टिंग संघ बाहेर पडले आहेत. त्यामुळे आय-लीग स्पर्धेत साळगावकरकडून खेळणाऱ्या डॅरेल डफीने संघाला सोडचिठ्ठी दिली. तो आता येत्या ६ जुलै पासून मोहन बगान संघाच्या सराव शिबिरात सहभागी होईल. डफीचे तसा करार केल्याचे सूत्रांनी सांगितले.
आय-लीग स्पर्धेत साळगावकर फुटबॉल क्लब संघाकडून रंटी मार्टीनलंती डॅरेल डफीने सर्वाधिक योगदान दिले होते. त्याने ११ गोल नोंदवले होते. २०१३ मध्येही तो साळगावकरकडून खेळला. याच वेळी त्याने भारतीय फुटबॉल क्षेत्रात पदार्पण केले होते. गेल्या सत्रातील इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत लोनवर एफसी गोवा संघाकडून डफी खेळला. यातही त्याने लक्ष वेधले. मोहन बगान संघाच्या व्यवस्थापन मंडळाने त्याचे संघात स्वागत करीत त्याच्या समावेशामुळे संघ अधिक भक्कम झाल्याचे म्हटले आहे.

Web Title: Durban Duffy Mohan