शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याची मुळीच इच्छा नाही : द्रविड

By admin | Updated: June 12, 2015 10:12 IST

डंकन फ्लेचर यांची रिक्त झालेली जागा पटकविण्याची अर्थात टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याची आपली कुठलीही इच्छा नसल्याचे माजी कर्णधार राहुल द्रविड याने गुरुवारी स्पष्ट केले.

मुंबई : डंकन फ्लेचर यांची रिक्त झालेली जागा पटकविण्याची अर्थात टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याची आपली कुठलीही इच्छा नसल्याचे माजी कर्णधार राहुल द्रविड याने गुरुवारी स्पष्ट केले. पत्रकारांशी बोलताना द्रविड म्हणाला,‘फ्लेचर यांचे स्थान घेण्यात आपल्याला रस असल्याचे वृत्त कानावर आले आहे. पण एक सांगू का, ‘हे पद स्वीकारण्यास मला कुठलेही स्वारस्य नाही. मी केवळ भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघाची धुरा सांभाळू इच्छितो. राष्ट्रीय संघाचा कोच बनण्याचा विचार माझ्या डोक्यातही आलेला नाही.’ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ स्पोर्टस् मॅनेजमेंटच्या दीक्षांत सोहळ्यात अतिथी असलेल्या राहुल द्रविडसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.द्रविड पुढे म्हणाला,‘ बांगला देश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची जबाबदारी संचालक रवी शास्त्री आणि अन्य सहयोगी स्टाफ योग्यरीत्या सांभाळत आहेत. रवी आणि त्यांचे सहकारी सक्षम असून माझी कोच बनण्याची मुळीच इच्छा नाही.’ भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघाचा कोच बनणे कुठल्याही खेळाडूंसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगून द्रविड पुढे म्हणाला, ‘मला हे काम सोपविण्यात आले, याचा आनंद वाटतो. दोन-तीन मालिका खेळायच्या असल्याने या काळात खेळाडूंना माझे अनुभव सांगेन.’ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा मेंटॉर राहण्याचा मला मोठा लाभ झाल्याचा द्रविडने आवर्जून उल्लेख केला. इतकी वर्षे खेळल्यानंतर दोन वर्षांपासून मेंटॉरची भूमिका निभावत व्यवस्थापन तसेच कोचिंग याकडे पाहण्याचा दृष्टिकोन माहित झाला. अनुभवासोबत कामगिरी उंचावत जाते. मला या गोष्टीची प्रतीक्षा असेल.’ भारत ‘अ’ संघात खेळाडूंची निवड करण्याचा कुठलाही लेखी फॉर्म्युला नाही. निवडकर्त्यांचे वेळोवेळी वेगळे लक्ष्य असते, असे द्रविडला वाटते. काही वेळा युवा तर काही वेळा पुनरागमनाच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या निवडीवर भर दिला जातो.(वृत्तसंस्था)