"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 10:51 IST2025-11-19T10:45:55+5:302025-11-19T10:51:11+5:30
...अन् रोनाल्डो झाला डोनाल्ड ट्रम्प यांचा पाहुणा

"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
Cristiano Ronaldo joins Donald Trump At White House Dinner : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये भव्य डिनर पार्टीचे आयोजन केले होते. सौदी अरबचे युवराज मोहम्मद बिन सलमान हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या हाय-प्रोफाईल डिनर पार्टीत फुटबॉल जगतातील सुपरस्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोनंही हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. पोर्तुगालचा स्ट्राइकर पहिल्या पंक्तीत बसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, सौदीचे युवराज आणि Apple चे CEO टिम कुक आणि Tesla चे संस्थापक एलन मस्क यांसारख्या जागतिक व्यावसायिक नेत्यांचे भाषण ऐकताना दिसून आले.
ट्रम्प यांच्या भाषणात रोनाल्डोचा खास उल्लेख, म्हणाले...
Donald Trump: “My son is a huge fan of Cristiano Ronaldo.”
— CristianoXtra (@CristianoXtra_) November 19, 2025
Messi plays in US but Trump's son watches Ronaldo in Saudi 😭
pic.twitter.com/p6OCaS97YH
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणाच्या रोनाल्डोचा खास उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले. मुलगा बैरन याची रोनाल्डोशी ओळख करून दिली. बैरन रोनाल्डोला भेटून प्रभावित झाला आहे. रोनाल्डोची भेट घडवून आणल्यामुळे मुलाच्या मनात माझ्याबद्दलचा आदर अधिक वाढेल, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांचा मुलगा बैरन ट्रम्प हा १९ वर्षांचा असून तो रोनाल्डोचा मोठा चाहता आहे. खुद्द ट्रम्प यांनी आपल्या भाषणात ते सांगितले. महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्यातील 'बाप-माणूस' जागा करत डिनरला आलेल्या रोनाल्डोसोबत शेअर केलेला मुलासंदर्भातील घरातील खास किस्सा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
सौदी फुटबॉलमध्ये रोनाल्डोची मोठी भूमिका
रोनाल्डो २०२२ पासून सौदी क्लब अल-नस्रसोबत आहे. सौदीच्या संघानं रोनाल्डोसोबत जवळपास २०० दशलक्ष डॉलरचा वार्षिक करार केला आहे. रोनाल्डो सौदीच्या फुटबॉल क्लबचा प्रमुख चेहरा आहे. २०३४ मध्ये सौदीत फिफा वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. हे यजमानपद मिळवून देण्यात रोनाल्डोची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहिली आहे.
राजकीय भेट रोनाल्डोमुळे ठरतीये अधिक लक्षवेधी
Cristiano Ronaldo taking a selfie with Georgina, Elon Musk, FIFA president and others in the White House. 😂 pic.twitter.com/PNmLvpVtdq
— TC (@totalcristiano) November 19, 2025
२०१८ नंतर सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांची व्हाईट हाऊसला दिलेली पहिली भेट आहे. त्यांच्यासोबत जवळपास २०१४ नंतर रोनाल्डो अमेरिकेत गेल्याचे पाहायला मिळाले. २०२६ चा फिफा वर्ल्ड कप रोनाल्डोसाठी अखेरचा असेल. एका बाजूला रोनाल्डो अखेरचा वर्ल्ड कप स्पर्धेत पोर्तुगालला जेतेपद मिळवून देण्यासोबत एक मोठं स्वप्न साकार करणार का? अशी चर्चा रंगत असताना डोनाल्ड-ट्रम्प भेटीचा मुद्दा गाजत आहे. सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील राजकीय भेटीच्या निमित्ताने रोनाल्डोची दिसलेली झलक राजनैतिक, क्रीडा आणि आर्थिक भागीदारी यांचा एक सुरेख संगम मानली जात आहे.