Denmark Open Badminton: Saina lost in first round | डेन्मार्क ओपन बॅडमिंटन :सायना पहिल्या फेरीतच पराभूत
डेन्मार्क ओपन बॅडमिंटन :सायना पहिल्या फेरीतच पराभूत

ओडेन्से: भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला बुधवारी डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला. जपानच्या सयाका तकाहाशीने सायनाला २१-१५, २३-२१ असे पराभूत केले.
जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या सायनाला या सामन्यातही आपली लय सापडली नाही. सायनाला जानेवारी महिन्यात झालेल्या इंडोनशिया मार्स्टस स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर आपली तंदुरुस्ती राखता आलेली नाही. चीन व कोरिया ओपन स्पर्धेतही सायना पहिल्या फेरीतच पराभूत झाली होती.
पुरुष एकेरीत समीर वर्माने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याने जपानच्या केंटा सुनेयामा याच्यावर २१-११, २१-११ अशी मात केली. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांनीही दुसºया फेरीत प्रवेश केला. या जोडीने जर्मनीच्या मार्विन सिडेल व लिडा एफरलर या जोडीचा २१-१६,२१-११ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्विनी पोनप्पा हे मैदानातच न आल्याने चीनच्या वांग यी लियु व हुआंग डोंग पिंग या जोडीला पुढे चाल देण्यात आली.

Web Title: Denmark Open Badminton: Saina lost in first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.