शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खेल परिषदेची निधी वाढविण्याची मागणी

By admin | Updated: January 11, 2016 03:21 IST

नव्याने स्थापन झालेल्या अखिल भारतीय खेल परिषदेने (एआयसीएस) खेळासाठी मिळत असलेला निधी देशाच्या जनसंख्येनुसार खूप कमी असल्याचे सांगत केंद्र सरकारने

नवी दिल्ली : नव्याने स्थापन झालेल्या अखिल भारतीय खेल परिषदेने (एआयसीएस) खेळासाठी मिळत असलेला निधी देशाच्या जनसंख्येनुसार खूप कमी असल्याचे सांगत केंद्र सरकारने त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी केली आहे.देशाच्या दृष्टीने सध्याचा ८८६ कोटी रुपयांचा खेळासाठीचा निधी खूपच कमी आहे आणि त्यासाठी सरकारने यात मोठ्या प्रमाणात वाढ करायला हवी. विविध शिफारशीत खेल परिषदेच्या सदस्यांनी पदकविजेत्यांसाठी राज्यांकडून एकसारखी बक्षीस रक्कम देण्याचेही आवाहन केले आहे, असे जवळपास अडीच तास चाललेल्या बैठकीनंतर एआयसीएसचे अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा म्हणाले.मल्होत्रा म्हणाले, ‘आम्हाला आपल्या क्रीडा धोरणाचा विस्तार करावा लागेल. आमचा निधी ८00 कोटी रुपयांचा आहे आणि प्रति व्यक्तीनुसार हे फक्त सात ते आठ रुपयेच होते. यातील काही राज्य गुजरात आणि हरियाणा हे चांगले करीत आहेत.’ या बैठकीत माजी भारतीय अ‍ॅथलिट पी.टी. उषा आणि माजी धनुर्विद्या प्रशिक्षक लिंबा रामदेखील उपस्थित होते. तथापि, माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर बैठकीस उपस्थित राहू शकला नाही. एआयसीएसने देशभरात १0 लाख स्पोर्टस् क्लब स्थापन करण्याची शिफारस केली आहे. मल्होत्रा म्हणाले की, ‘प्रत्येक गावात खेळांच्या सुविधा असायला हव्या आणि खासदार आणि आमदारांनी त्यांच्या निधी खेळाच्या सुविधा निर्माण करण्यावर खर्च करायला हवा. त्यासाठी आम्ही १0 लाख स्पोर्टस् क्लब स्थापन करण्याची शिफरास केली आहे.’ या वर्षी होणाऱ्या रियो आॅलिम्पिकविषयी ते म्हणाले की, ‘रिओ आॅलिम्पिकमध्ये भारत कमीत कमी १00 खेळाडूंचे पथक खेळवेल, अशी आम्हाला आशा आहे. याशिवाय आम्ही बॉक्सिंगसारख्या वादग्रस्त संघटनांवर तोडगा काढण्यावर चर्चा करीत आहोत.’(वृत्तसंस्था)