शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीची ‘खिल्ली’!

By admin | Updated: April 27, 2015 01:54 IST

‘सुपर’ गोलंदाजीनंतर कर्णधार विराट कोहली (३५) आणि ‘षट्कार किंग’ ख्रिस गेलच्या (६२) नाबाद ९५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने

दिल्ली : ‘सुपर’ गोलंदाजीनंतर कर्णधार विराट कोहली (३५) आणि ‘षट्कार किंग’ ख्रिस गेलच्या (६२) नाबाद ९५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दहा गडी आणि ५७ चेंडू राखून मात केली. ‘आयपीएल’मधील २६ व्या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करीत बंगलोरने दिल्लीची एकप्रकारे ‘खिल्ली’च उडवली. यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सचा डाव अवघ्या १८.२ षटकांत ९५ धावांवर संपुष्टात आला होता. हे सोपे आव्हान बंगलोरने १०.३ षटकांत गाठले. दिल्लीच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बंगलोरने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल या जोडीने गोलंदाजांची धुलाई करीत अवघ्या ३६ चेंडूंत संघाचे अर्धशतक साजरे केले. गेलने २९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर विराटने २३ चेंडूंत नाबाद ३५ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ६ चौकारांचा समावेश आहे. दुसरीकडे, ख्रिस गेलने नाबाद ६२ धावा केल्या. या धावा त्याने केवळ ४० चेंडूंत फटकारल्या. यामध्ये गेलने ६ चौकार आणि ४ षट्कार ठोकले.त्याआधी, दिल्लीची या सत्रातील ९५ ही नीचांकी धावसंख्या ठरली. मिशेल स्टार्कचे ३ बळी दिल्लीसाठी घातक ठरले. केदार जाधवच्या सर्वाधिक ३३ धावांच्या खेळीमुळे दिल्लीला ९५ धावसंख्येपर्यंत तरी मजल मारता आली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विराटचा हा निर्णय गोलंदाजांनी यशस्वी ठरवला. पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर स्टार्कने अय्यरला शून्यावर पायचित केले. त्यानंतर मयंक अग्रवाल आणि जेपी ड्यूमिनी या जोडीने ३५ धावांची भागीदारी केली. गेल्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या डेव्हिड विजेने ही जोडी फोडली. १४ चेंडूंत १३ धावा करणाऱ्या ड्यूमिनीला त्याने कार्तिककरवी झेलबाद केले. त्यानंतर अ‍ॅरोनने सलग दोन धक्के दिले. युवराज सिंग आणि अँजेलो मॅथ्यूजला त्याने अनुक्रमे २ आणि शून्यावर माघारी धाडले. त्यावेळी दिल्लीची स्थिती ४ बाद ३९ अशी होती. केदार जाधव आणि मयंक अग्रवाल यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मयंक इक्बाल अब्दुल्लाच्या चेंडूला ‘कट’ करण्याच्या नादात कार्तिककडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर नव्याने आलेले फलंदाज केवळ हजेरी लावत परतले. अमित मिश्रा (२) आणि नदीम या दोघांनाही स्टार्कने सलग बाद करीत दिल्लीची ‘दैना’ केली. (वृत्तसंस्था)