शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

गतविजेत्यांना मुंबई इंडियन्सचे आव्हान

By admin | Updated: April 7, 2015 23:38 IST

सुनील नारायण प्रकरण विसरुन कोलकाता नाईट रायडर्स आज, बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या अभियानाला

कोलकाता : सुनील नारायण प्रकरण विसरुन कोलकाता नाईट रायडर्स आज, बुधवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नारायण याच्या गोलंदाजीबद्दल चॅम्पियन लीग टी- २० स्पर्धेत तक्रार करण्यात आली होती. विश्वचषक स्पर्धेतही तो खेळू शकला नव्हता. मात्र, ‘बीसीसीआय’ने त्याला रविवारी क्लिन चीट दिली.कोलकाता नाईट रायडर्स संघाने इडन गार्डनच्या खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी सुनील नारायण सारखीच गोलंदाजी करणारा के. सी. करियप्पा याला दोन कोटी ४० लाख रुपये देऊन आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. बुधवारी येथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडूवर पकड ठेवणे कठीण होणार आहे.दोन्ही संघ तुल्यबळ असून मुंबईकडे किरॉन पोलार्ड, कोरे अ‍ॅँडरसन व अ‍ॅरॉन फिंच सारखे धडाकेबाज फलंदाज आहेत. २०१३ मध्ये मुंबईने याच मैदानावर चेन्नई सुपरकिंग्जला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. मागील वर्षी मुंबईला सलग पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी आपला खेळ उंचावत अंतिम सामन्यात चेन्नईला पराभूत केले.मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या आवडत्या मैदानावर चांगली खेळी खेळू शकतो. या मैदानावर त्याने एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती.कोलकाता नाईट रायडर्सच्या रॉबिन उत्थपा याने ११ रणजी सामन्यांत ९१२ धावा केल्या आहेत. तो धडाकेबाज फलंदाज व संघाचा कर्णधार गौतम गंभीरसमवेत डावाची सुरुवात करेल. मधल्या फळीत मनीष पांडे, सूर्यकुमार यादव व युसुफ पठाण यांच्यावर देखील संघाची जबाबदारी असेल. युसुफ सध्या फॉर्ममध्ये नसला तरी तो आपल्या खेळाच्या जोरावर कोणताही सामना फिरवू शकतो. गोलंदाजीची मदारमोर्नी मॉर्कल व उमेश यादव यांच्यावर असेल.बांगलादेशच्या शाकिब अल हसन याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. तसेच योहान बोथा, ब्रॅड हॉग व अझहर मेहमूद उपयुक्त खेळाडू आहेत.मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा भार लसिथ मलिंगा व विनयकुमार यांच्यावर असेल. त्याचबरोबर इडन्स गार्डनच्या खेळपट्टीवर हरभजन सिंग व प्रग्यान ओझा यांची फिरकी गोलंदाजी देखील निर्णायक ठरेल.( वृत्तसंस्था)