दालमियांच्या प्रकृतीत सुधारणा

By Admin | Updated: September 19, 2015 03:57 IST2015-09-19T03:57:51+5:302015-09-19T03:57:51+5:30

बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली असून, सध्या आयसीयूत ठेवण्यात आले आहे.

Dalmiya's health improvements | दालमियांच्या प्रकृतीत सुधारणा

दालमियांच्या प्रकृतीत सुधारणा

कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली असून, सध्या आयसीयूत ठेवण्यात आले आहे.
७५ वर्षांच्या दालमिया यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, ‘‘इस्पितळात त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवली जात आहे. ईसीजीवर बारकाईने नजर असून, काल रात्र अँजिओग्राफी करण्यात आली. गुरुवारी रात्री त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार करताच इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला.’’ पहाटे ३ वाजता दालमिया शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांशी तसेच बंगाल क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुली हादेखील या वेळी उपस्थित होता.
त्यांची पत्नी सकाळी इस्पितळातून घरी परतली. माहिती मिळताच प. बंगालचे प्रभारी क्रीडामंत्री अरुप बिश्वास आणि कॅबच्या अधिकाऱ्यांनी इस्पितळाकडे धाव घेतली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Dalmiya's health improvements