शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्डकप भारताने जिंकावा यासाठी कट रचला जातोयं - ICC अध्यक्ष

By admin | Updated: March 20, 2015 11:07 IST

वर्ल्ड कप भारताने जिंकावा यासाठी कट रचला जात असून एकाच सामन्यात पंच डझनभऱ चुकीचे निर्णय देऊ शकत नाही असे आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २० - क्वार्टर फायनलमध्ये भारताने बांग्लादेशवर मात करत दिमाखात प्रवेश केला असला या सामन्यातील पंचाच्या चुकीच्या निर्णयावर आयसीसीचे अध्यक्ष व बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष मुस्तफा कमाल भलतेच नाराज झाले आहेत. वर्ल्ड कप भारताने जिंकावा यासाठीच हा कट रचला जात असून एकाच सामन्यात पंच डझनभऱ चुकीचे निर्णय देऊ शकत नाही असे मुस्तफा यांनी म्हटले आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही पंचांच्या निर्णयाविरोधात आयसीसीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. 
गुरुवारी पार पडलेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारताला विजय मिळाला असला तरी या सामन्यात पंचांनी दिलेले निर्णय वादग्रस्त ठरले. रोहित शर्मा ९० धावांवर असताना फुलटॉस चेंडू टोलवण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला होता.मात्र पंचांनी तो नो बॉल ठरवले व रोहितला जीवदान मिळाले. यानंतर रोहितने आणखी ४७ धावा काढून भारताच्या डावाला आकार दिला. याशिवाय महमदुल्लाहचा शिखर धवनने सीमारेषेजवळ टिपलेला झेल वादग्रस्त ठरला होता.  या दोन्ही प्रकरणांमध्ये पंचांनी चुकीचे निर्णय दिल्याने बांग्लादेश पराभूत झाल्याची बांग्लादेशी क्रिकेटप्रेमींना वाटते. ढाकामध्ये सामन्यातील पंचांविरोधात निदर्शनंही करण्यात आली. 
आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनीदेखील बांग्लादेशी क्रिकेटप्रेमींच्या आरोपांशी सहमती दर्शवत आयसीसीवरच टीकास्त्र सोडले. मुस्तफा हे स्वतः गेल्या काही वर्षांपासून बांग्लादेश क्रिकेट बोर्डात सक्रीय आहेत. 'भारताने वर्ल्डकप जिंकावे यासाठी कट रचला जात आहे. क्रिकेटमध्ये पंचांकडूनही चुका होतात हे गृहीत धरले तरी एकाच सामन्यात पंचांनी १२ चुकीचे निर्णय देणे हे संशयास्पद वाटते' असे सूचक विधान मुस्तफा कमाल यांनी केले आहे. सामन्या दरम्यान स्टेडियमवरील मोठ्या स्क्रिनवर जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा असा संदेश झळकत होता. सामना सुरु असताना स्टेडियममधील मोठ्या स्क्रिनवर असे संदेश झळकणे हे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन ठरते असे मुस्तफा कमाल यांनी म्हटले आहे. मी हा प्रकार आयसीसीच्या सीईओंच्या निदर्शनास आणून दिला, पण त्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. सामना सुरु होण्यापूर्वीच भारत जिंकणार हे बहुधा ठरले होते असे खोचक विधानही त्यांनी केले. 
आयसीसीचे अध्यक्षपद हे केवळ मानाचे असून आयसीसीचे सर्वाधिकार चेअरमनकडे असतात. मुस्तफा कमाल हे अध्यक्ष असून एन. श्रीनिवासन हे आयसीसीचे चेअरमन आहेत. श्रीनिवासन यांची कोंडी करण्यासाठी कमाल यांनी हा आरोप केल्याची चर्चा आहे.