शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटर रवींद्र जाडेजाला 6 लाखांना लावला चुना !

By admin | Updated: August 17, 2016 14:51 IST

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या लग्नात त्याला 6 लाखांना फसवल्याची घटना उघडकीस आली आहे

ऑनलाइन लोकमतअहमदाबाद, दि. 17 - भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या लग्नात त्याला 6 लाखांना फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याआधी लग्नाच्या वरातीतल्या गोळीबारामुळे त्याचं लग्न विशेष चर्चेत आलं होतं. आता जाडेजाला एका कंपनीने 6 लाखांचा चुना लावण्याची घटना समोर आली आहे.

रवींद्र जाडेजाचं लग्न 17 एप्रिल झालं. या शाही विवाहसोहळ्यासाठी अहमदाबादच्या अ‍ॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसोबत 11 लाखांचं कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलं होतं. मात्र कंपनीचे मॅनेजर श्याम त्रिवेदी, केवल पटेल आणि उर्वी बावरिया यांनी जडेजा कुटुबीयांना अपेक्षित काम न केल्याने रवींद्र जाडेजाच्या बहिणीने पोलिसांत तक्रार केली आहे. त्याच्या बहिणीनं लग्नाच्या आयोजनाचं काम दुसऱ्या कंपनीला दिलं होतं. मात्र लग्न होऊन चार महिने उलटल्यानंतरही अहमदाबादच्या अ‍ॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून 6 लाख रुपये त्यांना परत मिळाले नाहीत.

बहीण नयनाबा जाडेजाने सांगितलं की, रवींद्रचं लग्न 17 एप्रिलला झालं होतं. लग्नाच्या व्हिडीओग्राफीसह सर्व कार्यक्रमांसाठी अ‍ॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला 11 लाख रुपयांमध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्याचं ठरलं होतं. यानिमित्तानं कंपनीला 6 लाख रुपये अ‍ॅडव्हान्सही देण्यात आले. मात्र कंपनीनं अपेक्षित काम न केल्यानं अ‍ॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंटकडून हे कॉन्ट्रॅक्ट काढून घेण्यात आलं होतं. लग्नाला चार महिने उलटल्यानंतरही कंपनीने पैसे परत करण्यास नकार दिला आहे. तसेच जे करायचंय ते करा, पण आम्ही पैसे परत देणार नाही, अशी धमकीही दिल्याची माहिती रवींद्र जडेजाच्या बहिणीनं दिली आहे.