शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट विंडीज

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

आयर्लंडचा विंडीजला धक्कापॉल स्टर्लिंग, एड जॉयस, नील ओब्रायनची अर्धशतकेनेल्सन : पॉल स्टर्लिंग (९२), एड जॉयस (८४) व नील ओब्रायन (७९) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीच्या जोरावर जायंट किलर आयर्लंडने सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत वेस्ट इंडिजचा ४ गडी राखून पराभव केला आणि आयसीसी विश्वकप स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली. गेल्या दोन विश्वकप ...


आयर्लंडचा विंडीजला धक्का
पॉल स्टर्लिंग, एड जॉयस, नील ओब्रायनची अर्धशतके
नेल्सन : पॉल स्टर्लिंग (९२), एड जॉयस (८४) व नील ओब्रायन (७९) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीच्या जोरावर जायंट किलर आयर्लंडने सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत वेस्ट इंडिजचा ४ गडी राखून पराभव केला आणि आयसीसी विश्वकप स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली.
गेल्या दोन विश्वकप स्पर्धेत पाकिस्तान व इंग्लंड यांच्यासारख्या अव्वल संघांना पराभवाचा तडाखा देणार्‍या आयर्लंडने या वेळीही धक्कादायक निकाल नोंदविण्याची परंपरा कायम राखली. वेस्ट इंडिजने दिलेले ३०५ धावांचे लक्ष्य आयर्लंडने ४५.५ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. विंडीजतर्फे वेगवान गोलंदाज जेरोम टेलरने ७१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले.
त्याआधी, वेस्ट इंडिजने निराशाजनक सुरुवातीनंतर लेंडल सिमन्स (१०२) व डॅरेन सॅमी (८९) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ७ बाद ३०४ धावांची मजल मारली. सिमन्स व सॅमी यांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. विश्वकप स्पर्धेत सहाव्या विकेटसाठी ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. विंडीजचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी किमान चार झेल सोडले. अर्धशतकी खेळी करणार्‍या जॉयसला वैयक्तिक ४२ धावांवर असताना जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर डॅरेन ब्राव्होने जीवदान दिले, तर नील ओब्रायनला २८ व ३८ धावांवर जीवदान मिळाले. सलामीवीर विलियम पोर्टरफिल्डचा (२३) स्वत:च्या चेंडूवर उडालेला झेल आंद्रे रसेलला टिपण्यात अपयश आले.
आयर्लंडला अखेरच्या १० षटकांत विजयासाठी २२ धावांची गरज होती. त्यानंतर ॲण्डी बिलबिर्नी (०९), गॅरी विल्सन (०१) आणि केव्हिन ओब्रायन (००) एकापाठोपाठ बाद झाले. नील ओब्रायनने संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले. नील ओब्रायनने ६० चेंडूंच्या खेळीमध्ये ११ चौकार ठोकले.
त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणार्‍या वेस्ट इंडिजची एकवेळ ५ बाद ८७ अशी अवस्था झाली होती, पण त्यानंतर सिमन्स व सॅमी यांनी डाव सावरला. ड्वेन स्मिथ (१८), ब्राव्हो (०), ख्रिस गेल (३६ धावा, ६५ चेंडू, ३ चौकार, १ षटकार) यांना मोठी खेळी करता आली नाही. दिनेश रामदिन (१) यालाही छाप सोडता आली नाही.
०००००