शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

पाकला परिस्थितीचे आकलन करता आले नाही

By admin | Updated: March 21, 2016 02:20 IST

भारताची गेल्या १५ वर्षांतील कामगिरी बघितल्यानंतर मला शारजामध्ये जुन्या स्पर्धांमध्ये पाकने केलेल्या कामगिरीची आठवण झाली.

भारताची गेल्या १५ वर्षांतील कामगिरी बघितल्यानंतर मला शारजामध्ये जुन्या स्पर्धांमध्ये पाकने केलेल्या कामगिरीची आठवण झाली. १९८०-९० च्या दशकांत विशेषत: शारजामध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवणारच असा आम्हाला विश्वास होता. गेल्या १५ वर्षांमध्ये भारतीय संघात तोच विश्वास झळकत आहे. पाकिस्तानने कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवण्याच्या घटनेला जवळजवळ अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. आशिया कप २०१४ मध्ये हे घडले होते. पण, त्यानंतर भारताने आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावला आहे. सर्वोत्तम कामगिरी करीत असल्यामुळे भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरत आहे. कोलकातामध्येही यापेक्षा वेगळे घडले नाही. युवी व कोहली यांच्यादरम्यान भागीदारी झाल्यानंतर भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. माझ्या मते १३०-१३५ धावांचे लक्ष्य असते तर भारतापुढे आव्हान निर्माण करता आले असते, पण ११८ धावांचे लक्ष्य फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर यजमान संघापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी पुरेसे नव्हते.सामन्याची सुरुवातच पाकसाठी अनुकूल नव्हती. त्यांना परिस्थितीचे आकलन करता आले नाही. फिरकीपटू इमाद वसीमला वगळून त्यांना खेळपट्टीचे आकलन करता आले नसल्याचे स्पष्ट झाले. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर चार वेगवान गोलंदाजांना खेळविण्याची रणनीती समजली नाही. भारतीय संघात युवी, शिखर व सुरेश रैना या तीन डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश असल्यामुळे डावखुऱ्या फिरकीपटूला न खेळविण्याची रणनीती समजू शकतो. विजय मिळवणाऱ्या संघात त्यांनी बदल करायला नको होता. महान खेळाडू इम्रानच्या बाजूला बसलो होतो. आफ्रिदीने आमिरचा स्पेल पूर्ण का केला नाही, असा प्रश्न इम्रानलाही पडला होता. आमिरला १३ व्या षटकांत पुन्हा गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. आफ्रिदीनेही चांगला मारा केला नाही. युवराजला कट शॉट खेळण्यास बाध्य करणे आवश्यक होते. त्यामुळे त्याला बाद करण्याची संधी होती. धोनीने आश्विनपेक्षा बुमराहवर विश्वास दाखविला. विजय मिळवल्यानंतर सर्व प्रश्न गौण ठरतात. धोनीला हा प्रश्न कुणी विचारणार नाही.एकूण विचार करता पाकिस्तानसाठी हा मानसिक प्रश्न आहे. आयसीसीच्या स्पर्धेमध्ये त्यांना पुन्हा एकदा भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मी सुरुवातीलाच शारजाचा उल्लेख केला आहे. भारताची मानसिकता त्या वेळच्या पाक संघाप्रमाणे आहे, तर पाकची मानसिकता त्या वेळच्या भारतीय संघाप्रमाणे आहे. (टीसीएम)पाकिस्तानने स्थानिक क्रिकेटवर लक्ष पुरविणे आवश्यक आहे. पाकमधील प्रथम श्रेणी क्रिकेटमधून दर्जेदार खेळाडू पुढे येतील, याबाबत विचार होणे आवश्यक आहे.