कोपा अमेरिका फुटबॉल : अर्जेंटिना अंतिम फेरीत

By Admin | Updated: June 22, 2016 18:25 IST2016-06-22T18:25:04+5:302016-06-22T18:25:04+5:30

एक गोलच्या जोरावर गतउपविजेत्या अर्जेंटिना संघाने अमेरिकाचा ४-० गोलने पराभव करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Copa América Football: Argentina in the final round | कोपा अमेरिका फुटबॉल : अर्जेंटिना अंतिम फेरीत

कोपा अमेरिका फुटबॉल : अर्जेंटिना अंतिम फेरीत

ऑनलाइन लोकमत

ह्युस्टन (टेक्सास), दि. 22 - बार्सिलोनाचा स्टार खेळाडू गोंजालो हिग्वेनचे अफलातून दोन गोल आणि लियोनल मेस्सी व एजिक्वील लावेजीने केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर गतउपविजेत्या अर्जेंटिना संघाने अमेरिकाचा ४-० गोलने पराभव करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सान्याच्या सुरुवातीपासूनच अर्जेंटिना संघाने वर्चस्व राखण्याचा प्रयत्न सुरू केला. अमेरिकन खेळाडूंना त्यांच्या प्रेक्षकांचा जरी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत होता, तरी अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर आक्रमक खेळ सुरू ठेवला. पहिल्या हाफच्या तिसऱ्या मिनिटाला फॉरवर्ड एजिक्वील लावेजीने हेडरने गोल करून आपल्या संघाचे खाते उघडले. त्यांनतर कर्णधार मेस्सीने ३२ व्या मिनिटाला गोल करून या स्पर्धेतील आपला पाचवा गोल नोंदविला. विश्रांंतीसाठी खेळ थांबला तेव्हा अर्जेंटिना २-० गोलनने आघाडीवर होते. पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा अमेरिका संघाच्या पाठीराख्यांना आपला संघ पुनरागमन करेल, असे वाटत होते. पण, त्यांचा अंदाज साफ चुकला. ५० व्या मिनिटाला पुन्हा अर्जेंटिनाच्या गोंजालो हिग्वेनने गोल करून आपल्या संघाला ३-० अशी आघाडी दिली. अमेरिकन खेळाडूंनी अनेक चाली रचल्या, पण अर्जेंटिनाच्या बचावफळीने त्यांचे आक्रमण परतावून लावले. ८६ व्या मिनिटाला हिग्वेनने या सामन्यात आपला दुसरा, तर संघाचा चौथा गोल केला. अर्जेंटिनाने केलेले चार गोल अमेरिकेच्या खेळाडूंना उरलेल्या वेळेत ना बरोबरी ना विजयी मिळवून देऊ शकत होते. अर्जेंटिना संघाला अंतिम सामन्यात चिली आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघाबरोबर खेळावे लागणार आहे. 

मेस्सी टॉप गोल स्कोअरर ...

मेस्सीने या सामन्यात एक गोल करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील आपला ५५ वा गोल केला. हा गोल नोंदवून मेस्सीने गॅब्रियन बतिस्तुताचा विक्रम मोडीत काढला. बतिस्तुताचे ७८ सामन्यांत ५४ गोल होते.

Web Title: Copa América Football: Argentina in the final round