शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कॉलम

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

न्यूझीलंडविरुद्ध अन्य संघांना सावध राहावे लागेल

न्यूझीलंडविरुद्ध अन्य संघांना सावध राहावे लागेल
हर्षा भोगले कॉलम...
माझ्या संपर्कातील सर्व जाणकार न्यूझीलंडला विजेतेपदाचा दावेदार मानत आहेत. या वेळी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या संघांनंतर न्यूझीलंडला विजेतेपदाची पंसती देण्यात येत आहे. न्यूझीलंड संघाने यापूर्वीही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याची कामगिरी केली आहे. पण, त्यांना जेतेपदासाठी कधीच पसंती दर्शविण्यात आलेली नाही. या वेळी मात्र या संघात असे काय आहे, याबाबत आपण विचार करू.
तीन चांगले फलंदाज, एक दर्जेदार गोलंदाजी अष्टपैलू, शानदार यष्टिरक्षक, एक अनुभवी फिरकीपटू आणि विविधता असलेले आक्रमक वेगवान गोलंदाजी आक्रमण कुठल्याही संघाला तुल्यबळ ठरविण्यास सक्षम आहे. त्याचसोबत या संघाला मायदेशातील वातावरणात खेळण्याचा लाभ मिळणार आहे. पण, न्यूझीलंड संघ या वेळी अपेक्षांचे दडपण पेलण्यास सक्षम आहे का? कारण, या संघाला अपेक्षांचे ओझे पेलण्याची सवय नाही. धक्कादायक निकाल नोंदविण्याची क्षमता असलेला संघ म्हणून नैसर्गिक खेळ करण्याचे स्वातंत्र्य असते. पण, दावेदार असल्यानंतर तुमच्यावर अपेक्षांचे ओझे असते. आगामी विश्वकप स्पर्धेत न्यूझीलंडच्या कामगिरीबाबत उत्सुकता राहील.
केन विलियम्सन सध्या स्टार आहे. काही प्रमाणात तो हशिम अमलाप्रमाणे आहे, असे वक्तव्य करणे धाडसाचे ठरेल. पण, अलीकडच्या कालावधीत मात्र विलियम्सनला अपयशाची चव चाखावी लागली नाही, हे मात्र खरे आहे. ब्रॅन्डन मॅक्युलम व रॉस टेलरच्या साथीने विलियम्सनच्या समावेशामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजीला बळकटी मिळाली आहे. मार्टिन गुप्टील मॅचविनर असून, कोरी ॲन्डरसन व ल्युक रोंची यांच्या समावेशामुळे मधल्या व तळाच्या फळीला बळकटी मिळाली आहे. त्यांच्या जोडीला अचूक मारा करण्याची क्षमता असलेला फिरकीपटू डॅनियल व्हेटोरी आहे. त्यामुळे न्यूझीलंडला वेगवान गोलंदाजीमध्ये पर्याय वापरण्याची संधी मिळणार आहे. न्यूझीलंड संघात ट्रेंट बोल्ट व मिच मॅकक्लेनेघन, त्याचप्रमाणे टीम साऊदी व केली मिल्स यांच्या समावेशामुळे गोलंदाजीमध्ये विविधता आहे. त्याचप्रमाणे ॲडम मिलनेच्या समावेशामुळे गोलंदाजी आक्रमणामध्ये विविधता आली आहे.