शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

द. आफ्रिकेचे थॉमस दिल्लीचे प्रशिक्षक

By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST

दक्षिण आफ्रिकेचे माजी तेजतर्रार गोलंदाज अल्फोंसो थॉमस हे आयपीएलच्या आगामी सत्रासाठी दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचे वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक असतील.

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचे माजी तेजतर्रार गोलंदाज अल्फोंसो थॉमस हे आयपीएलच्या आगामी सत्रासाठी दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचे वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक असतील.थॉमस यांनी पाकिस्तानविरुद्ध २00७ मध्ये एकमेव टी-२0 आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही; परंतु ते आयपीएल, बिग बॅश, इंग्लिश टी-२0 आणि बीपीएलसारख्या लीगमध्ये खेळलेले आहेत.आयपीएलमध्ये ते पुणे वॉरियर्स संघाचे सदस्य होते. त्यांनी २१४ टी-२0 सामन्यांत २४८ विकेट्स घेतल्या आहेत. दिल्ली डेअर डेव्हिल्सनुसार थॉमस वेगवान गोलंदाजांसोबत छोट्या करारावर काम करतील. मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन म्हणाले, आम्ही अल्फोंसोची सेवा घेऊन खूप खूश आहोत. त्यांना टी-२0 चे खूप ज्ञान आहे. त्यांचा अनुभव आमच्या गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.थॉमस म्हणाले, ‘‘मी आयपीएल खेळण्याचा पूर्ण आनंद घेतला आहे. आता दिल्ली डेअर डेव्हिल्सबरोबर प्रशिक्षक म्हणून विशेष अनुभव असेल. गॅरीने जेव्हा माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला, तेव्हा मी तत्काळ तो स्वीकारला. (वृत्तसंस्था)संघात जहीर खान आणि अ‍ॅल्बी मॉर्कलसारख्या अनुभवी गोलंदाजांबरोबर मोहम्मद शमी, नाथन कुल्टर नाईल आणि गुरिंदर संधू यांच्यासारखे युवा गोलंदाज आहेत. त्यांच्याबरोबर काम करणे रोमहर्षक ठरेल.’’ सेरेनाचा ७00 वा विजयकी बिस्केने : सात वेळेसची चॅम्पियन सेरेना विल्यम्सने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करतानाच डब्ल्यूटीए सर्किटमध्ये तिच्या कारकिर्दीतील ७00 व्या विजयाची नोंद केली.सेरेना विल्यम्सने सबाइन लिसिकी हिचा ७-६, १-६, ६-३ असा पराभव केला. या स्पर्धेतील सेरेनाचा हा सलग १६ वा विजय होता.आता तिची लढत जगातील तृतीय मानांकित खेळाडू सिमोना हालेप हिच्याविरुद्ध होईल. सिमोना हालेप हिने अमेरिकेच्या मानांकित स्लोएने स्टिफेन्सचा ६-१, ७-५ असा पराभव केला. दरम्यान, जागतिक क्रमवारीतील नवव्या मानांकित खेळाडू आंद्रिया पेत्कोविच दुसऱ्या उपांत्य फेरीत कार्ला सुआरेज नवारोविरुद्ध खेळेल.पुरुष गटात दोन वेळेसचा चॅम्पियन अँडी मरे याने अमानांकित डोमेनिक थियेमचा ३-६, ६-४, ६-१ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. आता त्याची लढत थॉमस बर्डीच आणि जुआन मोनाको यांच्यात विजयी होणाऱ्या खेळाडूविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)