सचिन शहरात

By Admin | Updated: February 20, 2016 00:07 IST2016-02-20T00:07:06+5:302016-02-20T00:07:06+5:30

दोन दिवस कऱ्हांडला जंगल सफारी करणार

In the city of Sachin | सचिन शहरात

सचिन शहरात

न दिवस कऱ्हांडला जंगल सफारी करणार
नागपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शुक्रवारी सायंकाळी आपल्या खासगी यात्रेनिमित्त नागपुरात दाखल झाला आणि थेट उमरेडसाठी रवाना झाला. कऱ्हांडलामध्ये सचिन पत्नी अंजली व मुलगा अर्जुन यांच्यासोबत जंगल भ्रमंतीचा आनंद घेणार आहे.
जागतिक क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज शुक्रवारी सायंकाळी विमानाने मुंबईहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. काही निवडक क्रिकेट चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. सचिन आपल्या कुटुंबीयांसह उमरेड नजिकच्या कऱ्हांडला जंगलामध्ये दोन दिवस घालविणार आहे. त्याच्यासोबत माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत वैद्य उपस्थित राहणार आहे. खासगी यात्रेनिमित्त सचिन प्रथमच नागपुरात आला आहे. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी तेंडुलकर आपल्या कुटुंबीयांसह मुंबईला रवाना होणार आहे.
विमानतळावर सचिनने लोकमत मीडिया लिमिटेड एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा यांच्यासोबत जवळजवळ पाच मिनिटे चर्चा केली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: In the city of Sachin