मुंबईचे राजस्थानसमोर १६५ धावांचे आव्हान
By Admin | Updated: April 14, 2015 22:11 IST2015-04-14T21:48:26+5:302015-04-14T22:11:43+5:30
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला १६५ आव्हान दिले आहे.

मुंबईचे राजस्थानसमोर १६५ धावांचे आव्हान
ऑनलाइन टीम
अहमदाबाद, दि. 14 - मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला १६५ आव्हान दिले आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने २० षटकात पाच बाद १६४ धावा केल्या. मुंबई इंडियन्सची सुरुवातीची खेळी खराब झाली, दहाव्या षटकापर्यंत ४५ धावा करत त्यांनी ३ गडी गमावले होते. त्यानंतर अँडरसन (५०) आणि पोलार्ड (७०) यांनी चांगली कामगिरी करत धावसंख्या वाढविली. फलंदाज रॉन फिंच १० धावावंर खेळताना जखमी झाल्याने तंबूत परतला. तर पार्थिव पटेल (१६), उन्मुक्त चंद (१२) आणि कर्णधार रोहित शर्मा अवघा शून्यावर बाद झाला.
राजस्थान रॉयल्सकडून धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, साउदी, ख्रिस मॉरिस आणि प्रवीण तांबेने प्रत्येकी एक बळी टिपला.