शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सिंग इंडियाला मान्यता नाही : आयओए

By admin | Updated: December 20, 2014 02:19 IST

बॉक्सिंगच्या संचालनासाठी केवळ भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाला (आयएबीएफ) मान्यता देऊ. बॉक्सिंग इंडियाला मान्यता

चेन्नई : बॉक्सिंगच्या संचालनासाठी केवळ भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाला (आयएबीएफ) मान्यता देऊ. बॉक्सिंग इंडियाला मान्यता प्रदान करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी आज, शुक्रवारी स्पष्ट केले. ‘आयओए’च्या वार्षिक आमसभेनंतर रामचंद्रन यांना या आशयाचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ‘आयओए देशात बॉक्सिंगच्या संचालनासाठी केवळ ‘एआयबीएफ’ला मान्यता देईल.’ बॉक्सिंग इंडियाला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने मान्यता दिली आहे. भारताची महिला बॉक्सर एल. सरितादेवी हिच्यावर झालेल्या अन्यायाला बॉक्सिंग इंडियानेच वाचा फोडली होती. बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जाजोदिया यांनी आयओए आणि क्रीडा मंत्रालयाकडे मान्यतेसाठी अर्ज केल्याची माहिती अलीकडे दिली होती; पण रामचंद्रन यांच्या वक्तव्यामुळे बॉक्सिंग इंडियाला मान्यता देण्याचा प्रस्ताव वादात अडकला आहे.रामचंद्रन म्हणाले, ‘ग्लास्गो राष्ट्रकुल, इंचियोन आशियाडमधील पदक विजेत्यांचा रोख पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. त्यात सुवर्ण विजेत्या खेळाडूस तीन लाख, रौप्य विजेत्यास दोन लाख आणि कांस्य विजेत्याला एक लाख दिले जातील.’ आयओएशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा संस्थांना चार लाखांचे दरवर्षी अनुदान देण्याची घोषणा रामचंद्रन यांनी केली. आयओए बैठकीचे चेन्नईत आयोजन दोन दशकानंतर करण्यात आले, हे विशेष. ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्यपदके जिंकली. (वृत्तसंस्था)