महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी घौडदौड

By Admin | Updated: October 21, 2016 00:59 IST2016-10-21T00:59:26+5:302016-10-21T00:59:26+5:30

महाराष्ट्राच्या मुलांनी छत्तिसगड संघाचा ४०-० असा फडशा पाडून १८ वर्षांखालील राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत धमाकेदार कूच केली. तसेच, महाराष्ट्राच्या

Both the teams of Maharashtra won the winning streak | महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी घौडदौड

महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी घौडदौड

मुंबई : महाराष्ट्राच्या मुलांनी छत्तिसगड संघाचा ४०-० असा फडशा पाडून १८ वर्षांखालील राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत धमाकेदार कूच केली. तसेच, महाराष्ट्राच्या मुलींनी देखील दणदणीत विजय मिळवताना आंध्रप्रदेशचा ३४-० असा धुव्वा उडवला. या शानदार विजयांसह महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व प्ले आॅफ सामन्यात प्रवेश केला.
बॉम्बे जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या ‘ई’ गटात महाराष्ट्राने पुनरागमनासाठी प्रयत्न करणाऱ्या छत्तिसगडचे सर्व प्रयत्न यजमानांनी हाणून पाडले. महाराष्ट्राच्या नियोजनबद्ध व आक्रमक खेळापुढे त्यांचा अखेरपर्यंत निभाव लागला नाही. दरम्यान, सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राने जम्मू-काश्मीरवर १९-० अशी मात केली.
मुलींच्या ‘डी’ गटात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर ३४-० असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमक खेळ करुन बाजी मारली. तत्पूर्वी, महाराष्ट्राने केरळचा २२-० असे नमवूण विजयी सलामी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Both the teams of Maharashtra won the winning streak