शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बोपन्ना-फ्लोरिनला उपविजेतेपद

By admin | Updated: January 17, 2016 03:24 IST

दुहेरीतील भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि रोमानियाचा फ्लोरिन मर्जिया या जोडीला सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

सिडनी : दुहेरीतील भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि रोमानियाचा फ्लोरिन मर्जिया या जोडीला सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जेमी मरे आणि ब्रुनो सोरेस या जोडीने फायनलमध्ये विजय मिळवून किताब आपल्या नावे केला. बोपन्ना आणि मर्जिया या चौथे मानांकन प्राप्त जोडीला अंतिम सामन्यात ब्रिटनचा जेमी मरे आणि ब्राझीलचा ब्रुनो सोरेस यांच्याकडून ३-६, ६-७ गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला. मरे आणि सोरेस यांनी हा सामना १ तास आणि २९ मिनिटांत आपल्या नावे केला. विशेष म्हणजे बोपन्ना आणि मर्जिया यांना हा सामना सुपर टायब्रेकपर्यंत खेचून ४-० अशी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, मरे आणि सोरेस यांनी जोरदार मुसंडी मारताना सामन्यासह किताबावर आपले नाव कोरले. भारत आणि रोमानियाच्या जोडीने पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सर्व्हिस गमावली. त्यानंतर मरे आणि सोरेस यांनी हा सेट ६-३ ने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये बोपन्ना आणि मर्जिया यांना कामगिरी उंचावता आली नाही. त्यामुळे त्यांचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. गत वर्षी स्पर्धेच्या दुहेरी लढतीत बोपन्नाने कॅनडाच्या डॅनियल नेस्टरसह जेतेपदाला गवसणी घातली होती. (वृत्तसंस्था)