मल्ल साक्षीचा बॉयफ्रेंड कदियानसोबत वाङ्निश्चय

By Admin | Updated: October 17, 2016 04:55 IST2016-10-17T04:55:48+5:302016-10-17T04:55:48+5:30

साक्षी मलिक हिने रविवारी बॉयफ्रेंड मल्ल सत्यव्रत कदियान याच्यासोबत रोहतक येथील निवासस्थानी एका समारंभात साक्षगंध उरकले.

Board meeting with Boyfriend Kadian | मल्ल साक्षीचा बॉयफ्रेंड कदियानसोबत वाङ्निश्चय

मल्ल साक्षीचा बॉयफ्रेंड कदियानसोबत वाङ्निश्चय


नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकची कांस्यविजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिने रविवारी बॉयफ्रेंड मल्ल सत्यव्रत कदियान याच्यासोबत रोहतक येथील निवासस्थानी एका समारंभात साक्षगंध उरकले. २४ वर्षांच्या साक्षीने कदियान आपला बॉयफ्रेंड असल्याचे काही दिवसांआधी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.
सत्यव्रतचे वडील सत्यवान कदियान स्वत: अर्जुन पुरस्कारप्राप्त मल्ल आहेत. ते म्हणाले, ‘‘हा खासगी सोहळा होता. मुलामुलीच्या घरच्या मंडळींचा कार्यक्रमात सहभाग होता. साक्षगंधचा सोहळा आनंदात पार पडला.’
सत्यव्रत २२ वर्षांचा आहे. साक्षीपेक्षा तो दोन वर्षांनी लहान असून रोहतकच्या आखाड्यात वडिलांच्या मार्गदर्शनात सराव करतो. २०१० च्या यूथ आॅलिम्पिकमध्ये त्याने कांस्य जिंकले होते. उभयतांमध्ये कुस्ती स्पर्धेदरम्यान प्रेम जडले. ‘सत्यव्रत माझ्या यशात मोठा वाटेकरी असून माझे स्वप्न तो स्वत:चे स्वप्न मानतो,’ असे साक्षीने आधीच स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Board meeting with Boyfriend Kadian