शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय संघातील स्थानासाठी मोठी स्पर्धा

By admin | Updated: March 22, 2017 00:00 IST

‘आगामी आॅलिम्पिकसाठी सुरु असलेल्या संघबांधणी प्रक्रीयेमध्ये ज्यूनिअर खेळाडूंना संधी दिली जात आहे. सिनिअर खेळाडूंना

बंगळुरु : ‘आगामी आॅलिम्पिकसाठी सुरु असलेल्या संघबांधणी प्रक्रीयेमध्ये ज्यूनिअर खेळाडूंना संधी दिली जात आहे. सिनिअर खेळाडूंना त्यांना पारखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, त्यांच्यावर संघातील आपले स्थान कायम ठेवण्याचेही आव्हान आहे. एकूणच, सध्या टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी ज्यूनिअर व सिनिअर खेळाडूंमध्ये चांगली स्पर्धा लागली आहे,’ असे वक्तव्य भारताचा हॉकी कर्णधार पी. आर. श्रीजेश याने केले. येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय शिबिरामध्ये श्रीजेशने म्हटले की, ‘संघबांधणीची ही नवी सुरुवात आहे आणि अनेक युवा खेळाडू मुख्य संभावित खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यास उत्सुक आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी ज्यूनिअर खेळाडूंसह सिनिअर खेळाडूंनाही कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. ज्यूनिअर खेळाडूंना कौशल्य आणि मैदानी कामगिरीमध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. त्यांना शिबीरामध्ये स्वत:ला सिध्द करावे लागेल, कारण त्यांची स्पर्धा थेट सिनिअर खेळाडूंसह आहे. त्याचवेळी, सिनिअर खेळाडूंना ज्यूनिअर खेळाडूंच्या तंदुरुस्ती आणि वेगाशी स्पर्धा करावी लागेल.’तसेच, ‘ज्यूनिअर खेळाडूंकडे संघाचे भविष्य आहे, याची आम्हाला कल्पना आहे. २०२० टोकियो आॅलिम्पिकसाठी आम्ही तयारी करत असल्याने त्यांच्यावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, असे असले तरी त्यांनी संघातील आपले स्थान निश्चित मानले नाही पाहिजे. संघातील स्थान त्यांनी मिळवले पाहिजे,’ असेही श्रीजेशने म्हटले. युवा खेळाडूविषयी श्रीजेशने पुढे म्हटले की, ‘राष्ट्रीय संघाची खेळण्याची पध्दत, रणनिती आखण्याची पध्दत, तसेच ती रणनिती समजून अमलनात आणण्यासाठी युवा खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिबीर खूप महत्त्वपूर्ण ठरेल. दरम्यान, ज्यूनिअर राष्ट्रीय संघात असताना त्यांनी आमचा सरावर जवळून पाहिला आहे आणि आम्ही एकाच शिबिरामध्ये राहतो. मात्र असे असले तरी, सराव पाहणे आणि त्याचा एक भाग होणे या दोन्ही गोष्टी पुर्णपणे वेगळ्या आहेत.’ (वृत्तसंस्था)