शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

विराटला मागे टाकत हा खेळाडू बनला भारताचा अव्वल फलंदाज

By admin | Updated: March 21, 2017 20:39 IST

नुकत्याच जाहिर झालेल्या आयसीसी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ 941 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 - रांचीतील तिसऱ्या कसोटीत पुजाराने मैदानात टीच्चून फलंदाजी करत 525 चेंडूंचा सामना करत 202 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. त्याच्या या खेळीचा फायदा त्याला नुकाताच आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी रँकिगमध्ये झाला आहे. तिन्ही प्रकारच्या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंमध्ये रणमशिन विराट कोहली अव्वल असतो पण आयसीसीच्या नव्या रँकिममध्ये भारताच्या पुजाराने त्याला मागे टाकत भारतीय खेळाडूत अव्वल स्थान पटकावले आहे. विराट कोहली चौथ्या तर पुजारा दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत पुजाराने गाठलेलं सर्वोच्च स्थान आहे.नव्या आयसीसीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ 941 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर पुजाराने 861 गुण मिळवत दुसरे स्थान गाठले आहे. पुजाराने इंग्लंडचा जो रुट (848) आणि भारताचा कर्णधार विराट कोहली (826) यांना मागे टाकले आहे. रांची कसोटीतील पुजाराच्या द्विशतकामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर समाधानकारक आघाडी घेता आली होती.गोलंदाजीत जाडेजाची अश्विनवर मात - जडेजाने आर अश्विनला मागे टाकत अव्वलस्थान पटकावलं आहे. रवींद्र जाडेजाने सात अंक मिळवत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. आयसीसी टेस्ट रँकिंमगध्ये श्रीलंकेचा रंगना हेराथ तिस-या स्थानावर आहे. त्यानंतर अमुक्रमे ऑस्ट्रेलियाचा जॉश हेजलवुड आणि इंग्लंडचा जेम्स एंडरसन आहेत. रांची कसोटी सामन्याआधी आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या नावे 892 अंक होते. रांची कसोटीत एकीकडे इतर गोलंदाज विकेट घेण्यासाठी संघर्ष करत असताना रवींद्र जडेजाने मात्र आपल्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केलं.