शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयची एजीएम २ मार्चला चेन्नईत होणार

By admin | Updated: February 9, 2015 02:47 IST

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे अनेक वेळा स्थगित करण्यात आलेली बीसीसीआयची बहुप्रतीक्षित वार्षिक सर्वसाधारण बैठक (एजीएम) आता २ मार्चला होणार आहे

चेन्नई : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे अनेक वेळा स्थगित करण्यात आलेली बीसीसीआयची बहुप्रतीक्षित वार्षिक सर्वसाधारण बैठक (एजीएम) आता २ मार्चला होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाच्या कामकाजावरून बनलेली अनिश्चिततेची स्थितीही समाप्त होण्याची शक्यता आहे. हा निर्णय मंडळाच्या आज येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत एन. श्रीनिवासन यांनी तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून सहभाग नोंदवला.आजच्या बैठकीत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरही चर्चा करण्यात आली आणि कायदेशीर सल्ल्यानुसार काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच माजी क्रिकेटपटूंचे मासिक मानधन ५0 टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही रक्कम जास्तीत जास्त ५0 हजार रुपये असेल. ही बैठक सुप्रीम कोर्टाच्या २२ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानंतर बोलावण्यात आली होती. न्यायालयाने आपल्या निर्णयात बीसीसीआयने सहा आठवड्यांच्या आत त्यांची सर्वसाधारण बैठक घेण्यास आणि निवडणूक घेण्यास सांगितले होते. आज झालेल्या बैठकीत विशेषत: कोर्टाच्या निर्णयावर जास्त चर्चा करण्यात आली. दरम्यान, बीसीसीआय कार्यकारी समितीच्या सदस्यांनी रविवारी सर्वसंमतीने एन. श्रीनिवासन अ‍ॅण्ड कंपनीविरुद्ध निराधार अफवा पसरवणाऱ्या असंलग्नित क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जावी, अशी सूचना केली. कार्यकारी समितीच्या एका सदस्याने रविवारी आदित्य वर्मा याच्या निराधार दावे करण्यावर आक्षेप घेतला आणि यावर कार्यकारी समितीने लक्ष द्यायला हवे, असे सांगितले. (वृत्तसंस्था)