शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयपुढे आयसीसीचे नमते

By admin | Updated: September 8, 2016 04:30 IST

जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डापुढे (बीसीसीआय) नमते घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) द्विस्तरीय कसोटीचा वादग्रस्त प्रस्ताव चर्चेआधीच मागे घेतला.

नवी दिल्ली : जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डापुढे (बीसीसीआय) नमते घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) द्विस्तरीय कसोटीचा वादग्रस्त प्रस्ताव चर्चेआधीच मागे घेतला.बीसीसीआयने प्रस्तावास विरोध केल्यानंतर श्रीलंका, झिम्बाब्वे आणि बांगलादेश बोर्डाने सुरात सूर मिळविला होता. तब्बल चार बोर्डांचा कडवा विरोध परवडणारा नाही, हे लक्षात येताच सीईओंच्या दोन दिवसांच्या बैठकीपूर्वीच प्रस्ताव बुधवारी मागे घेण्यात आला. यावर नव्याने विचार करण्यात येईल, इतकेच प्रस्ताव मागे घेताना सांगण्यात आले. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर सुरुवातीपासून या प्रस्तावाच्या विरोधात होते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत बोर्डासाठी ही पद्धत मारक तसेच प्रतिगामी असल्याचे त्यांचे मत होते. ठाकूर यांनी आज आयसीसीच्या भूमिकेचे स्वागत केले. आयसीसी सदस्यांंनी गांभीर्य ओळखून प्रस्ताव मागे घेतला याचे मी स्वागत करतो. प्रमुख बोर्ड म्हणून सर्वांना सोबत घेऊन चालण्याची बीसीसीआयची भूमिका आहे. क्रिकेटचे हित वगळून कुठलीही तडजोड नाही. लोकप्रियता आणि विकास खुंटेल, अशा कुठल्याही गोष्टींना आम्ही पाठिंबा देणार नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले.बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी आयसीसीचे आभार मानले. राहुल जोहरी यांनी द्विस्तरीय कसोटी क्रिकेटमुळे कसे नुकसान होऊ शकते, हे आयसीसीला पटवून देण्यात मोलाची भूमिका वठविली आहे. आयसीसीला कुठल्याही पद्धतीचा पायाभूत बदल करायचा झाल्यास दोन तृतीयांश बहुमताची गरज भासते. दहापैकी सात मते त्यांना आपल्या बाजूने हवी होती; पण चार सदस्य देश विरोधात गेल्याने आयसीसीने नमते घेतले. नेहमी सोबत असणारे इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया बोर्ड आयसीसीकडेच असले तरी विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सुरात सूर मिळविण्याचे ठरविल्याने आयसीसीला हा प्रस्ताव पारित करणे कठीण होऊन बसले असते. विंडीज बोर्ड चार दिवसांची कसोटी आणि दिवस-रात्रीचा कसोटी सामन्याच्या बाजूने असले तरी कसोटी क्रिकेटमधील संघांची दोन गटात विभागणी करणे आपल्याला मान्य नसल्याचे विंडीज बोर्डाचे मत होते. (वृत्तसंस्था)