शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआय सुधारित

By admin | Updated: February 16, 2015 21:11 IST

ईडीची बीसीसीआय,आयपीएलला नोटीस

ईडीची बीसीसीआय,आयपीएलला नोटीस
मुंबई : २००९ मध्ये आयपीएल मीडिया अधिकार अफरातफरीत फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) बीसीसीआय, आयपीएलचे अधिकारी आणि खासगी मल्टिमीडिया फर्मला नोटीस बजावली आहे. या सर्वांवर ४२५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे.
या प्रकरणी ज्यांना नोटीस बजावण्यात आली त्यात बीसीसीआयचे निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन, तत्कालीन आयपीएल आयुक्त ललित मोदी, सीओओ सुंदर रमण यांच्यासह वर्ल्ड स्पोर्टस् ग्रुप (डब्ल्यूएसजी)आणि मल्टी स्क्रीन मीडिया (एमएसएम) यांचा समावेश आहे. या सर्वांवर मीडिया अधिकार देताना अफरातफर केल्याचा आणि अवैध व्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सोमवारी आयपीलएच्या आठव्या पर्वाचा लिलाव सुरू असताना ईडीने ही कारवाई केली, हे विशेष. बीसीसीआयने २००८ साली डब्ल्यूएसजी या कंपनीला ९१८ मिलियन अमेरिकन डॉलर रकमेच्या मोबदल्यात दहा वर्षांचे मीडिया अधिकार बहाल केले होते. त्याच वर्षी डब्ल्यूएसजीने एमएसएमशी करार करीत सोनीला अधिकृत ब्रॉडकास्टर बनविले. वर्षभरानंतर हा करार बदलण्यात येऊन नऊ वर्षांचा करण्यात आला. त्यापोटी मल्टी स्क्रीनने १.६३ बिलियन अमेरिकन डॉलर मोजले होते. एमएसएम ही सिंगापूरची तसेच डब्ल्यूएसजी ही मॉरिशस येथील कंपनी आहे. ईडीने २००९ साली या व्यवहाराची फेमा (परकीय चलन विनिमय) कायद्यांतर्गत चौकशी सुरू केली. एमएसएमने डब्ल्यूएसजीला ४२५ कोटी रुपये सुविधा शुल्कापोटी अवैधरीत्या दिल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम करारातील अटीनुसार बीसीसीआयला मिळाली नसून अवैध लाभार्थ्र्यांना पोहोचली. प्रसारण कराराशी संलग्न असलेल्या सर्वच अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविल्यानंतर ईडीने नोटीस बजावली आहे. ४५ दिवसांच्या आत सर्वांनी अपील करावे, असे ईडीच्या नोटिशीत म्हटले आहे. (वृत्तसंस्था)