शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यक भागीदारी करूशकले नाहीत फलंदाज : महेंद्रसिंग धोनी

By admin | Updated: October 22, 2016 00:57 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने न्यूझीलंडविरुद्ध येथे दुसऱ्या वन-डेत झालेल्या निसटत्या पराभवास नियमित अंतराने विकेट पडणे आणि मोठी भागीदारी होऊ न शकणे

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने न्यूझीलंडविरुद्ध येथे दुसऱ्या वन-डेत झालेल्या निसटत्या पराभवास नियमित अंतराने विकेट पडणे आणि मोठी भागीदारी होऊ न शकणे या बाबी कारणीभूत असल्याचे सांगितले.टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत गोलंदाजी चांगली केली; परंतु फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांना या सामन्यात ६ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. धोनीने पराभवाबद्दल निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘या पराभवासाठी कोणा एका खेळाडूला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. आम्ही लक्ष्याचा पाठलाग करताना सातत्याने विकेट गमावल्या आणि एकही मोठी भागीदारी रचण्यात अपयशी ठरलो. या लढतीत प्रत्येक खेळाडूने आपल्या कामगिरीत थोडीथोडी सुधारणा केली असती तर सामन्याचा निकाल वेगळा असता. गोलंदाजांनी त्यांच्यावरील जबाबदारी यशस्वीपणे पेलली, असे मला वाटते; परंतु लवकर लवकर विकेट गमावल्याने आमच्यावर दबाव वाढला. आम्ही अखेरपर्यंत धावसरासरी राखली; परंतु विकेट हातात नसल्याने आम्ही लक्ष्यापासून दूर राहिलो.’’धोनीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांनाही श्रेय दिले. ‘‘न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करताना कमी धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव केला. खेळपट्टी ही फलंदाजासाठी प्रतिकूल होती असे नव्हते; परंतु पाहुण्या संघातील गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करताना फलंदाजांना फक्त जखडूनच ठेवले नाही, तर विकेटही घेतल्या. आम्ही मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी मिळवली होती; परंतु आता ती गमावली आहे. आम्ही पुढील लढतीत जोरदार मुसंडी मारण्याच्या इराद्याने खेळू.’’