शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश बाद फेरीत

By admin | Updated: March 10, 2015 01:23 IST

अखेरच्या क्षणापर्यंत विजयाचे पारडे दोलायमान असलेल्या लढतीत मोहंमद महमुदुल्लाच्या शतकी खेळीनंतर रुबेल हुसेनच्या अचूक

अ‍ॅडलेड : अखेरच्या क्षणापर्यंत विजयाचे पारडे दोलायमान असलेल्या लढतीत मोहंमद महमुदुल्लाच्या शतकी खेळीनंतर रुबेल हुसेनच्या अचूक माऱ्याच्या जोरावर बांगलादेशने सोमवारी इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला आणि विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. या पराभवामुळे इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.महमुदुल्लाच्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने ७ बाद २७५ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडचा डाव ४८.३ षटकांत २६० धावांत गुंडाळला. महमुदुल्ला विश्वकप स्पर्धेत शतकी खेळी करणारा बांगलादेशचा पहिला खेळाडू ठरला. ‘अ’ गटातून न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया, श्रीलंका आणि बांगलादेश संघांनी उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे; तर केवळ एक विजय मिळविणाऱ्या इंग्लंड संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. पाच सामने खेळणाऱ्या बांगलादेश संघाचा हा तिसरा विजय आहे. बांगलादेशतर्फे हुसेनने ९.३ षटकांत ५३ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले; तर मशर्रफ मुर्तजा व तस्कीन अहमद यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला योग्य साथ दिली. इंग्लंडतर्फे आघाडीच्या फळीतील इयान बेल (६३ धावा, ८२ चेंडू) तर तळाच्या फळीतील बटलर व ख्रिस वोक्स (नाबाद ४२) यांनी संघर्षपूर्ण खेळ केला, पण संघाला विजय मिळवून देण्यात त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. त्याआधी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बांगलादेशातर्फे महमुदुल्लाने १०३, तर मुशफिकर रहीमने ८९ धावांची खेळी केली. नात्याने साडूभाऊ असलेले महमुदुल्ला व रहीम यांनी पाचव्या विकेटसाठी १४४ चेंडूंमध्ये १४१ धावांची भागीदारी केली. एक वेळ बांगलादेश संघाची २२व्या षटकात ४ बाद ९९ अशी अवस्था झाली होती. महमुदुल्लाच्या शतकी खेळीत ७ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. यापूर्वी बांगलादेशातर्फे विश्वकप स्पर्धेत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम तमीम इक्बालच्या नावावर होता. त्याने एका आठवड्यापूर्वी नेल्सनमध्ये स्कॉटलंडविरुद्ध ९५ धावांची खेळी केली होती. रहीमने ७७ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी करताना ८ चौकार व १ षटकार फटकावला. वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पहिल्या दोन षटकांत बांगलादेशाचे सलामीवीर इमरुल कायसे व तमीम इक्बाल यांना माघारी परतवले होते. त्या वेळी बांगलादेशाची २ बाद ८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सौम्या सरकार व महमुदुल्ला यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. सरकारने ५ चौकार व एका षटकाराच्या साह्याने ४० धावा फटकावल्या. सरकारला जॉर्डनने बाद केले. त्यानंतर मोईन अलीने स्टार अष्टपैलू शाकीब अल् हसनला तंबूचा मार्ग दाखविला. महमुदुल्ला ४६व्या षटकात धावबाद झाला. बांगलादेशाने अखेरच्या १० षटकांत ७८ धावा फटकावल्या. इंग्लंडतर्फे जॉर्डन व अँडरसन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.(वृत्तसंस्था)