Bajrang, Ravi Kumar win gold in the Rome Ranking Wrestling Championship | रोम रॅँकिंग कुस्ती स्पर्धेत बजरंग, रवी कुमारला सुवर्ण
रोम रॅँकिंग कुस्ती स्पर्धेत बजरंग, रवी कुमारला सुवर्ण

रोम : भारताचा स्टार मल्ल बजरंग पुनिया व रवी कुमार यांनी येथे रोम रँकिंग सिरीज स्पर्धेत आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावत आॅलिम्पिक वर्षात शानदार सुरुवात केली. बजरंगने ६५ किलो फ्रीस्टाईल गटाच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या जॉर्डन मायकल ओलिव्हरविरुद्ध दमदार पुनरागमन करताना ४-३ ने विजय मिळवला.

रवी आपल्या नियमित ५७ किलो वजगटात ऐवजी ६१ किलो गटात सहभागी झाला आहे. त्याने शनिवारी रात्री फायनलमध्ये कजाखस्तानच्या नुरबोलाट अब्दुलीयेव्ह विरुद्ध १२-२ ने विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. सोनिपतच्या या २३ वर्षीय मल्लाने मोलदोव्हाच्या अलेक्सांद्रू चिरतोआका व कजाखस्तानच्या नुरीस्लाम सानायेवविरुद्ध शानदार विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.
दरम्यान, जितेंदरचे ७४ किलो गटात तर विश्व चॅम्पियनशिपचा रौप्यपदक विजेता दीपक पुनियाचे ८६ किलो गटात आव्हान संपुष्टात आले.

जितेंदरने पहिल्या फेरीत युक्रेनच्या डेनिस पावलोव्हचा १०-१ ने पराभव केला होता, पण उपांत्यपूर्व फेरीत त्याला तुर्कीच्या सोनेर देमिरतासविरुद्ध ०-४ ने पराभव स्वीकारावा लागला. त्याला रेपेचेजमध्ये खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला त्याचा लाभ घेता आला नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Bajrang, Ravi Kumar win gold in the Rome Ranking Wrestling Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.