शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

By admin | Updated: February 22, 2016 03:48 IST

ज्यो बर्न्स आणि स्टिव्हन स्मिथ यांच्या शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपली स्थिती मजबूत केली.

ख्राईस्टचर्च : ज्यो बर्न्स आणि स्टिव्हन स्मिथ यांच्या शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपली स्थिती मजबूत केली.बर्न्सने तिसरे कसोटी शतक झळकावताना आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च १७० धावांची खेळी केली, तर स्मिथने १४ वे शतक ठोकताना १३८ धावा केल्या. त्यामुळे आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडच्या पहिल्या डावाच्या ३७० धावांच्या प्रत्युत्तरात ४ बाद ३६३ धावा करताना चोख उत्तर दिले. बर्न्स आणि स्मिथ यांनी तिसऱ्या गड्यासाठी २८९ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी न्यूझीलंडविरुद्ध आॅस्ट्रेलियातर्फे विक्रमी ठरली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अ‍ॅडम व्होजेस २, तर नाथन लियोन ४ धावांवर खेळत होते.बर्न्सने नील वेगनर (६३ धावांत २ गडी) याच्या उसळत्या चेंडूंचा पूर्ण दिवसभर यशस्वीपणे सामना केला; परंतु दिवसाचा खेळ संपण्यास २८ चेंडू बाकी असताना तो या वेगवान गोलंदाजाला पूल करण्याच्या प्रयत्नात स्क्वेअरलेगवर उभ्या असलेल्या मार्टिन गुप्टिलकडे झेल देऊन बसला. त्याने ३२१ चेंडूंत २० चौकार मारले. तत्पूर्वी बर्न्सला पंचांनी ३५ धावांवर खेळत असताना यष्टिपाठीमागे झेलबाद ठरवले होते; परंतु रेफरल घेतल्यानंतर त्याला नाबाद ठरवण्यात आले. चेंडू त्याच्या हाताला लागल्याचे स्पष्ट झाले होते. पाच चेंडूंनंतर स्मिथदेखील वेगनरच्या चेंडूवर गुप्टिलकडे झेल देऊन तंबूत परतला. स्मिथने २४१ चेंडूंत १४ चौकार मारले.(वृत्तसंस्था)...आणि सर्वांचा श्वास रोखला गेलाआॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टिव्हन स्मिथच्या हेल्मेटवर तेजतर्रार उसळता चेंडू आदळल्यानंतर सर्वच खेळाडू आणि प्रेक्षकांचा श्वास रोखला गेला होता. तथापि, त्यानंतर स्मिथने शानदार शतक झळकावले. दुसऱ्या दिवशी चहापानाच्या ठीक आधी स्मिथ ७८ धावांवर फलंदाजी करीत असताना न्यूझीलंडचा तेजतर्रार गोलंदाज नील वेगनर याचा उसळता चेंडू स्मिथच्या हेल्मेटवर आदळला. त्यामुळे स्मिथ जमिनीवर पडला. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि नंतर स्मिथने १३८ धावांची शानदार शतकी खेळी पूर्ण केली. १५ महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे डोक्यावर उसळता चेंडू आदळल्याने आॅस्ट्रेलियन सलामीवीर फिलिप ह्यूजचे निधन झाले होते. त्या घटनेची पुन्हा आठवण आजच्या वेगनरच्या उसळत्या चेंडूमुळे झाली.संक्षिप्त धावफलक : पहिला डाव ३७०.आॅस्ट्रेलिया (पहिला डाव) : ४ बाद ३६३; (ज्यो बर्न्स १७०, स्टिव्हन स्मिथ १३८, नील वेगनर २/६३, ट्रेंट बोल्ट २/८५).