शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडिजवर मात करत आॅस्ट्रेलिया अजिंक्य

By admin | Updated: June 27, 2016 17:32 IST

यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वॅडच्या (नाबाद ५७) नाबाद अर्धशतकी खेळीनंतर जोश हेजलवुड (५-५०) व मिशेल मार्श (३-३२) यांच्या अचूक मा-याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने सोमवारी

ऑनलाइन लोकमत
बारबाडोस, दि. २७ -  यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वॅडच्या (नाबाद ५७) नाबाद अर्धशतकी खेळीनंतर जोश हेजलवुड (५-५०) व मिशेल मार्श (३-३२) यांच्या अचूक मा-याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने सोमवारी अंतिम लढतीत वेस्ट इंडिजचा ५८ धावांनी पराभव केला आणि तीन देशांचा समावेश असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत जेतेपदाचा मान मिळवला. 
आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ९ बाद २७० धावांची आव्हानात्मक मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाºया वेस्ट इंडिज संघाचा डाव ४५.४ षटकांत २१२ धावांत गुंडळाला. वॅडने चमकदार कामगिरी करताना ५२ चेंडूंमध्ये २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५७ धावांची खेळी केली. 
बारबाडोसच्या केन्सिग्टन ओव्हल मैदानावर २७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान विंडीज संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर जॉन्सन चार्ल्सने संघातर्फे सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. त्यात चार चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. 
दिनेश रामदिनने ६७ चेंडूंमध्ये २ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ४० धावा केल्या. कर्णधार जेसन होल्डर (३४ धावा, ३७ चेंडू, ३ चौकार व १ षटकार) व सुनील नारायण (२३ धावा, १८ चेंडू, ४ चौकार) यांचे प्रयत्न अपुरेच पडले. किरोन पोलार्डने २० तर कार्लोस ब्रेथवेटने १४ धावांची खेळी केली. आॅस्ट्रेलियातर्फे हेजलवुडने ९.४ षटकांत ५० धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेतले. मार्शने ३२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेत त्याला योग्य साथ दिली. नॅथन कोल्टर नाईल व अ‍ॅडम जम्पा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 
त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाºया आॅस्ट्रेलिया संघाने ९ बाद २७० धावांची आव्हानात्मक मजल मारली. सलामीवीर फिंचने ४७ आणि कर्णधार स्टिव्हन स्मिथने ४६ धावांची खेळी केली. मॅथ्यू वॅडने नाबाद ५७ धावा फटकावल्या. फिंचच्या खेळीत ६ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे तर स्मिथने ५९ चेंडूंना सामोरे जाताना चार चौकार ठोकले. मिशेल मार्शने गोलंदाजीमध्ये छाप सोडण्यापूर्वी ४५ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकारांच्या साहायाने ३२ धावांची खेळी केली. जॉर्ज बेली (२२) व मिशेल स्टार्क (१७) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. बेली व स्मिथ यांनी ११.४ षटकांत तिसºया विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. या लढतीतील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. 
विंडीजतर्फे होल्डरने १० षटकांत ५१ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले तर शैनन गेब्रियलने ७ षटकांत ५८ धावा बहाल करताना २ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवली. किरोन पोलार्ड, सुनील नारायण आणि सुलेमान बेन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.