शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
6
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
7
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
8
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
9
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
10
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
11
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
12
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
13
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
14
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
15
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
16
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
17
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
18
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
19
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
20
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियाचे भारताला १६१ धावांचे आव्हान

By admin | Updated: March 27, 2016 21:00 IST

टी- २० वर्ल्डकपमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धावांचे १६१ आव्हान दिले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात सहा बाद १६० धावा केल्या.

ऑनलाइन लोकमत 
मोहाली, दि. २७ -  टी- २० वर्ल्डकपमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धावांचे १६१ आव्हान दिले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात सहा बाद १६० धावा केल्या. 
फलंदाज आरोन फिंचने या सामन्यात सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ३४ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार लगावत ४३ धावा कुटल्या. तर, उस्मान ख्वाजा आणि एरॉन फिंचने पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची सलामी दिली. ख्वाजाला २६ धावांवर नेहराने यष्ठीपाठी धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर संघाच्या ७२ धावा असताना अश्विनच्या गोलंदाजीवर  धोकादायक डेव्हिड वॉर्नर पाच धावांवर यष्टीचीत झाला. ग्लेन मॅक्सवेल ३१ धावांवर बाद झाला.  त्यानंतर गोलंदाज हार्दीक पांड्याने दिला ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का देत जेम्स फॉल्कनर १0 धावांवर बाद केले. 
युवराजने पहिल्याच षटकात कर्णधार स्मिथला अवघ्या दोन धावांवर यष्टीपाठी धोनीकरवी झेलबाद करुन ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. त्यानंतर सलामीवीर एरॉन फिंचला ४३ धावांवर  हार्दिक पंडयाने शिखर धवनकरवी झेलबाद केले. मॅक्सवेल १३ धावांवर नाबाद असून, त्याची साथ द्यायला धोकादायक शेन वॉटसन मैदानात आला आहे. 
आयसीसी टी-२० वर्ल्डकपची उपांत्यफेरी गाठण्यासाठी भारतीय संघासाठी 'करो या मरो' असलेला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना सुरु झाला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील मोहालीच्या मैदानावर हा सामना होत आहे. 
विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताला पाकिस्तान विरुद्धचा सामना वगळता एकाही सामन्यात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शेवटच्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाने रडतखडत विजय मिळवला होता. हा सामना गमावला असता तर, भारतावर आजच्या सामन्यात सरस धावगती राखून विजय मिळवण्याचे दडपण वाढले असते.
नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने तीन सामने जिंकून क्लीनस्वीप विजय मिळवला होता. मात्र आजच्या सामन्यात भारतीय खेळाडूंना लौकीकाला साजेशी कामगिरी केली तरच, भारतासाठी उपांत्यफेरीचे दरवाजे उघडू शकतात. भारतासाठी दिलाशाची बाब म्हणजे आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० च्या बारा सामन्यात भारताने आठ विजय मिळवले आहेत.