आॅस्ट्रेलिया एशिया कपचा विजेता

By Admin | Updated: January 31, 2015 23:21 IST2015-01-31T23:21:47+5:302015-01-31T23:21:47+5:30

स्ट्रायकर जेम्स ट्रोयसीने अतिरिक्त वेळेत नोंदवलेल्या वेळेत आॅस्ट्रेलिया संघाने दक्षिण कोरियाचा २-१ गोलने पराभव करून एशिया क्लब फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद जिंकले.

Australia Asia Cup winner | आॅस्ट्रेलिया एशिया कपचा विजेता

आॅस्ट्रेलिया एशिया कपचा विजेता

सिडनी : स्ट्रायकर जेम्स ट्रोयसीने अतिरिक्त वेळेत नोंदवलेल्या वेळेत आॅस्ट्रेलिया संघाने दक्षिण कोरियाचा २-१ गोलने पराभव करून एशिया क्लब फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद जिंकले.
सिडनी येथील स्टेडियम आॅस्ट्रेलियाच्या मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत निर्धारित वेळेत १-१ ने गोल बरोबरीत संपलेल्या या चुरशीच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या मसीमो लुआंगोने ४५व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाला १-० ची आघाडी दिली. इंज्युरी टाईममध्ये दक्षिण कोरियाच्या सोन ह्यूंग मिनने गोल करून बरोबरी साधली.
अतिरिक्त वेळेत आॅस्ट्रेलियाच्या ट्रोयसीने गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दक्षिण कोरियाचे ५५ वर्षांनंतर विजेतेपद जिंकण्याची स्वप्न भंग झाले. एशियाई फुटबॉलमध्ये आपले स्थान निश्चित केल्यानंतर पहिले विजेतेपद जिंकण्याचे आॅस्ट्रेलियाचे स्वप्न पूर्ण झाले.

Web Title: Australia Asia Cup winner