शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

विनेश फोगाट राजकारणात येणार? शेतकऱ्यांच्या आंदोलनातून तिने एका दगडात दोन पक्षी मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 13:14 IST

विनेश फोगाटने शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला.

vinesh phogat news : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारणारी विनेश फोगाट. विनेश भारतात परतल्यावर तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेव्हा काँग्रेस नेते तिच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यामुळे विनेश लवकरच राजकारणात प्रवेश करेल अशी अटकळ बांधली जात होती. विनेशने या विषयावर आतापर्यंत मौन बाळगले होते. आज शनिवारी ती शंभू बॉर्डवर शेतकरी आंदोलनात सहभागी झाली. यावेळी विनेशला राजकारणाबाबत प्रश्न केला असता, तिने निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले.

काँग्रेसने तिकीट दिल्यास हरियाणाची निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विनेश फोगाटला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना विनेश म्हणाली की, मी निवडणूक लढवण्याबाबत काहीही बोलणार नाही. मी इथे राजकारणावर भाष्य करणार नाही. मी माझ्या कुटुंबात आले आहे. इथे तुम्ही राजकारणाबद्दल बोलाल तर तुम्ही शेतकऱ्यांचा लढा आणि संघर्ष उद्ध्वस्त करत आहात. त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यासारखे आहे. आज सर्व लक्ष माझ्याकडे नसून यांच्याकडे द्यायला हवे. एकूणच विनेशने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर फोकस करण्याचे आवाहन केले. 

विनेशचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सहभागतसेच मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, मी एक ॲथलीट आहे. मी संपूर्ण देशाची आहे. कोणत्या राज्यात निवडणूक होत आहे याच्याशी माझा काहीच संबंध नसतो. मला फक्त एवढेच माहिती आहे की, आपल्या देशातील शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्या समस्यांवर सरकारने तोडगा काढायला हवा. सरकारने या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे, असेही विनेश फोगाटने सांगितले.

विनेश फोगाट पुढे म्हणाली की, शेतकऱ्यांना इथे आंदोलनस्थळी बसून २०० दिवस झाले आहेत. हे पाहून फार वाईट वाटते. ते सर्व या देशाचे नागरिक आहेत. शेतकरी देश चालवतात. त्यांच्याशिवाय काहीही शक्य नाही, अगदी खेळाडूंनाही शेतकऱ्यांशिवाय पुढे जाता येत नाही. जर त्यांनी आमच्यासाठी धान्य पिकवले नाही तर आम्ही स्पर्धा करू शकणार नाही. खेळाडू म्हणून आम्ही देशाचे इतक्या मोठ्या स्तरावर प्रतिनिधित्व करतो, पण आपल्या कुटुंबासाठी काही करू शकत नाही, त्यांना दुःख झालेले पाहूनही आम्ही काहीच करू शकत नाही. मी सरकारला त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती करते. गेल्या वेळी सरकारने आपली चूक मान्य केली होती. आता त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. शेतकरी असेच रस्त्यावर बसले तर देशाची प्रगती होणार नाही.

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीPoliticsराजकारण