जकार्ता - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळाडू कोणत्याही मैदानावर समोरासमोर आले की तेथील वातावरण चांगलेच तापले. त्याचा प्रत्यय आशियाई स्पर्धेतील बॉक्सिंग रिंगमध्ये आला. महिला गटातील 60 किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात भारताची पवित्रा आणि पाकिस्तानची पर्वीन रुखसाना समोरासमोर आल्या. पण, भारतीय बॉक्सर्सच्या ठोशासमोर पाकिस्तानी खेळाडूचा निभाव लागला नाही.
Asian Games 2018: भारतीय बॉक्सर्सच्या ठोशाला घाबरून पाकिस्तानी खेळाडूनं काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 16:18 IST