शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

सातारच्या अदितीचा 'सर्वोच्च' सन्मान! ऐतिहासिक विश्वविजेतेपदाची जगाकडून दखल, मिळाला मानाचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 12:59 IST

तिरंदाजी क्षेत्रात तिरंग्याची शान वाढवणाऱ्या सातारच्या लेकीला सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.

तिरंदाजी क्षेत्रात तिरंग्याची शान वाढवणाऱ्या सातारच्या लेकीला सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. मूळची सातारची असलेल्या अदिती स्वामी हिने मागील वर्षी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. लक्षणीय बाब म्हणजे १७ वर्षांची अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली आहे. तसेच ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी प्रथमच सुवर्ण पदक जिंकले. आशियाई आणि जागतिक चॅम्पियन तिरंदाज अदिती स्वामी हिला २०२३ मध्ये केलेल्या ऐतिहासिक कामगिरीनंतर वर्षातील सर्वोत्कृष्ट तिरंदाजीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अदितीसह भारतीय कंपाऊंड प्रकाराचे प्रशिक्षक सर्जिओ पाग्नी यांना संघासह उत्कृष्ट कामगिरीसाठी वर्ष २०२३ चा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक हा पुरस्कार मिळाला. वयाच्या नवव्या वर्षापासून अदितीने तिरंदाजीला सुरुवात केली. अदिती ही मूळची सातारची असून तिची आई आंबवडी या गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे, तर वडील पेशाने शिक्षक आहेत. तिला एक लहान भाऊ असून तो देखील आर्चरीमध्ये नशीब आजमावत आहे.

अदितीची गरूडझेपदरम्यान, १७ वर्षीय अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली आहे. तिने मागील वर्षी महिलांच्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. सांघिक आणि वैयक्तिक सुवर्ण जिंकून अदितीने तमाम भारतीयांच्या मनात जागा केली. अदिती ही मूळची सातारची असून तिची आई आंबवडी या गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे.

सातारच्या लेकीची सोनेरी कामगिरी २०२३ हे वर्ष अदितीसाठी खूप खास राहिले. याच वर्षी तिने ऐतिहासिक विजयासह सोनेरी कामगिरी केली. अदितीचे वडील पेशाने शिक्षक आहेत, तर आई सातारा जिल्ह्यातील आंबवडी या गावची ग्रामसेवक आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील तरूणीचे हे यश अनेकांसाठी प्रेरणा आहे. तिचा भाऊ देखील बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत तिरंदाजीचा सराव करत आहे. २०१६ मध्ये अर्थात ९ वर्षांची असताना अदितीने या क्षेत्रात पाऊल ठेवले अन् २०१९ पासून महाराष्ट्रासाठी पदक जिंकले. राज्यस्तरावर चमकल्यानंतर २०२१ पासून अदिती आजतागायत भारतासाठी पदकांची कमाई करत आहे. 

टॅग्स :Gold medalसुवर्ण पदकsatara-acसाताराInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीIndiaभारत