शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

आर्यनची मुख्य फेरीत धडक

By admin | Updated: April 27, 2015 23:31 IST

मुंबईकर आर्यन गोवेस आणि पुण्याचा साहिल गवारे यांनी आपापल्या सामन्यात सहज विजय मिळवताना अखिल भारतीय पुरुष खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.

मुंबई: मुंबईकर आर्यन गोवेस आणि पुण्याचा साहिल गवारे यांनी आपापल्या सामन्यात सहज विजय मिळवताना अखिल भारतीय पुरुष खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.खार जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईकर आर्यनला मुख्य फेरीत आगेकूच करण्यासाठी फारसे प्रयास करावे लागले नाहीत. उत्सर्ग ग्रोवर विरुद्धचा पहिला सेट सहजपणे ६-४ असा जिंकून आर्यनने आघाडी घेतली. यानंतर उत्सर्गने झुंजार खेळ करीत दुसऱ्या सेटमध्ये १-१ अशी बरोबरी साधली. परंतु याचवेळी त्याचा गुडघा दुखावला व त्याने सामन्यातून माघार घेतली. या वेळी पहिला सेट जिंकून आघाडीवर असलेल्या आर्यनला विजयी घोषित केले.डेक्कनच्या साहिलनेदेखील एकतर्फी झालेल्या सामन्यात आक्रमक खेळ करताना वत्सीन ठक्करचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवत दिमाखात आगेकूच केली. त्याचवेळी कर्नाटकच्या विक्रम नायडूने अटीतटीच्या झालेल्या सामन्यात बाजी मारून मुख्य फेरीत प्रवेश केला. मिहिर अकोलकर विरुद्ध झालेल्या या सामन्यात टायब्रेकमध्ये गेलेला पहिला सेट चांगलाच रंगला. या वेळी विक्रमने ७-६(८-६) असा विजय मिळवून आघाडी घेतली. यानंतरच्या सेटमध्ये मात्र ६-२ असा खेळ करीत विक्रमने सफाईदार विजय मिळवला.दुसऱ्या बाजूला ध्रुव सुनिश, शाहबाझ खान आणि सौरभ पाटील या महाराष्ट्राच्या त्रयीनेदेखील आपापल्या सामन्यात विजयाची नोंद करताना स्पर्धेच्या मुख्य फेरीत आपली जागा निश्चित केली. (क्रीडा प्रतिनिधी)